• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर ठरलेला?

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 16, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज १६ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, यात भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महायुतीमधील जागावाटप आणि निकालाचे समीकरण पाहता जळगाव महापालिकेवर आता भाजपचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

​बिनविरोध विजयाने झाली होती सुरुवात..
या निवडणुकीत मतदानापूर्वीच महायुतीने आपली ताकद दाखवून दिली होती. ७५ पैकी १२ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते, ज्यामध्ये भाजपचे ६ आणि शिवसेना (शिंदे गट) ६ उमेदवारांचा समावेश होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने ६३ जागांसाठी चुरस पाहायला मिळाली होती.

​असे आहे पक्षीय बलाबल:
आज झालेल्या मतमोजणीअंती महापालिकेतील सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे. ७५ जागांचे पक्षनिहाय संख्याबळ खालीलप्रमाणे आहे:
​भारतीय जनता पक्ष (भाजप): ४६ जागा
​शिवसेना (शिंदे गट): २२ जागा
​राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ०१ जागा
​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट): ०५ जागा
​अपक्ष: ०१ जागा

​भाजपचा स्वबळावर बहुमताचा आकडा पार..
महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी ३८ हा बहुमताचा आकडा आवश्यक आहे. भाजपने एकट्याने ४६ जागा जिंकून हा आकडा सहज पार केला आहे. मात्र, राज्यात आणि स्थानिक पातळीवर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याशी महायुती असल्याने, जळगावात महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे.

​महापौर-उपमहापौर पदाचे समीकरण..
संख्याबळानुसार भाजपचा महापौर होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महायुतीच्या सूत्रानुसार, शिवसेनेला (शिंदे गट) उपमहापौर पद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार प्रफुल्ल देवकर यांना महायुतीमध्ये सन्मानजनक स्थान दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

​या विजयामुळे जळगाव शहरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला असून, आता सर्वांचे लक्ष आगामी महापौर निवडीकडे लागले आहे.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे..
प्रभाग क्रमांक- १
अ मधून रिता विनोद सपकाळे(भाजप ), ब मधून दिलीप बबनराव पोकळे (शिवसेना ), क संगीता दांडेकर (शिवसेना ), ड मध्ये भारती सागर सोनावणे ( अपक्ष ) ,

प्रभाग क्रमांक – २
अ मधून सागर शामकांत सोनवणे (शिवसेना ),ब उज्ज्वला किशोर बाविस्कर (शिवसेना ),क मध्ये पूजा विजय जगताप (भाजप ) , ड मधून विजय गजानन बांदल (भाजप ) ,

प्रभाग क्रमांक ३
अ अर्चना संजय पाटील भाजप ),ब मध्ये प्रतीक्षा कैलास सोनवणे (भाजप ) ,क मधून प्रवीण रामदास कोल्हे (शिवसेना ) , ड मधून निलेश विशवनाथ तायडे (भाजप )

प्रभाग क्रमांक ४
अ मध्ये शशीबाई शिवचरण ढंढोरे (भाजप ) ब मध्ये विद्या मुकुंद सोनावणे (भाजप ) , क मधून कल्पेश कैलास सोनवणे (भाजप), ड मध्ये पियुष ललित कोल्हे (शिवसेना ),

प्रभाग क्रमांक ५
अ मध्ये विष्णू रामदास भंगाळे (शिवसेना ) ,ब मंगला संजय चौधरी ( शिवसेना ) , क आशा रमेश पाटील (भाजप ), ड मधून नितीन बालमुकुंद लड्ढा (भाजप )

प्रभाग क्रमांक ६
अ मध्ये अर्शिन बानो शोएब खाटीक (शिवसेना उबाठा), ब मध्ये शुचिता अतुल हाडा (भाजप), क मधून अमित पांडुरंग काळे (भाजप), ड मध्ये दीपक प्रभाकर सूर्यवंशी (भाजप)

प्रभाग क्रमांक ७
अ मध्ये दीपमाला मनोज काळे (भाजप), ब मध्ये अंकिता पंकज पाटील (भाजप), क विशाल सुरेश भोळे (भाजप), ड मध्ये चंद्रशेखर अत्तरदे (भाजप)

प्रभाग क्रमांक ८
अ मधून ता सागर पाटील (भाजप ) ब मधून मानसी निलेश भोईटे (भाजप ) , क अमर जैन ( भाजप), ड नरेंद्र आत्माराम पाटील (शिवसेना ),

प्रभाग क्रमांक ९
अ मध्ये मनोज सुरेश चौधरी (शिवसेना ) ,ब मधून प्रतिभा गजानन देशमुख (शिवसेना ) , क जयश्री राहुल पाटील (भाजप ) ,ड मधून चंद्रशेखर शिवाजी पाटील (भाजप ) ,

प्रभाग क्रमांक १०
अ मधून सुरेश माणिक सोनवणे (भाजप ) ब मधून माधुरी अतुल बारी (भाजप ) ,क मध्ये कविता किरण भोई ( भाजप ) , ड मध्ये जाकीर खान रसूल खान (भाजप )

प्रभाग क्रमांक ११
अ डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे (शिवसेना ) ,ब मध्ये संतोष मोतीराम पाटील (शिवसेना ) ,क सिंधुताई विजय कोल्हे (शिवसेना ) ,ड ललित विजय कोल्हे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १२
अनिल अडकमोल (भाजप ),ब उज्ज्वला बेंडाळे (भाजप ),क गायत्री राणे (भाजप ), ड मध्ये नितीन बरडे (भाजप ),

प्रभाग क्रमांक १३
अ नितीन सपके (भाजप ),ब मधून सुरेखा नितीन तायडे (भाजप), क मध्ये वैशाली अमित पाटील (भाजप ), ड प्रफुल्ल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी अजित पवार गट ),

प्रभाग क्रमांक १४
अ मधून सुनील सुपडू महाजन (भाजप ),ब मधून जयश्री सुनील महाजन (भाजप ),क मध्ये राबियाबी अमजद खान (भाजप ),ड मधून रितिका संजय ढेकळे (भाजप )

प्रभाग क्रमांक १५
अ अरविंद देशमुख (भाजप ),ब कलाबाई नारायण शिरसाळे (भाजप ), क रेशमा कुंदन काळे (शिवसेना ),ड मध्ये प्रकाश बालाणी (भाजप ),

प्रभाग क्रमांक १६
अ मधून डॉ. वीरेन खडके (भाजप), ब मधून वंदना संतोष इंगळे (भाजप), क रंजना विजय वानखेडे (भाजप), ड मध्ये सुनील वामनराव खडके (भाजप)

प्रभाग क्रमांक १७
अ मध्ये जरीनाबी शब्बीर शहा(उबाठा), ब हीनाबी शाकीर खान(उबाठा), इब्राहिम पटेल(उबाठा) ड अक्षय वंजारी (उबाठा )

प्रभाग क्रमांक १८
अ डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे (शिवसेना ), ब मध्ये नलूबाई तुळशीदास सोनवणे (शिवसेना), क मध्ये अनिता सुरेश भापसे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १९
अ मध्ये रेखा चुडामण पाटील (शिवसेना ),ब गणेश (विक्रम ) सोनवणे (शिवसेना ), क मध्ये निकिता दुर्गेश वंजारी (शिवसेना), ड मध्ये राजेंद्र घुगे पाटील (भाजप ) यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.


 

Tags: #elections#jalgaon_city#political

ताज्या बातम्या

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group