• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ब्लँकेट खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ५३ हजारात फसवणूक

उत्तर प्रदेशातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 30, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
ब्लँकेट खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ५३ हजारात फसवणूक

​जळगाव, (प्रतिनिधी) : हिवाळ्यासाठी विक्रीला आलेली एक लाख तीन हजार ४५० रुपये किमतीची ब्लँकेट घेऊन अवघे ५० हजार रुपये देत, उर्वरित रकमेसाठी जळगावात कापड व्यावसायिकाची ५३ हजार ४५० रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील तीन विक्रेत्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​​मेरठ (उत्तर प्रदेश) येथील इकरार इसरार अहमद (वय ३०) यांचा कापड व्यवसाय असून, त्यांनी हिवाळ्यातील विक्रीसाठी ब्लँकेट मागवले होते. या ब्लँकेटची ४५० नग असलेली नऊ पार्सले गेल्या दोन महिन्यांपासून जळगावातील ट्रान्सपोर्टमध्ये पडून होती. ती खराब होऊ नये म्हणून अहमद यांनी काही विक्रेत्यांना जळगावातूनच ब्लँकेट उचलून घेण्यास सांगितले. यासाठी त्यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला जळगावात पाठवले.
​

विक्रेते अफजल, आरीफ आणि असलम (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांनी जळगावात आलेल्या कापड व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. त्यांनी एक लाख तीन हजार ४५० रुपये किमतीची ब्लँकेटची नऊ पार्सले ताब्यात घेतली. मात्र, कर्मचाऱ्याला केवळ ५० हजार रुपये दिले आणि उर्वरित ५३ हजार ४५० रुपये ब्लँकेटच्या विक्रीनंतर देण्याचे आश्वासन दिले. ​यातील एका आरोपीने कर्मचाऱ्याला चहा पिण्याच्या बहाण्याने बाजूला नेले आणि उर्वरित दोन आरोपींनी ब्लँकेटची नऊ पार्सले वाहनात भरून तात्काळ उत्तर प्रदेशकडे पोबारा केला.

​जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल..
​फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कापड व्यावसायिक इकरार इसरार अहमद यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार, अफजल, आरीफ, आणि असलम नामक तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​जिल्हापेठ पोलीस या तिन्ही आरोपींचा कसून शोध घेत आहेत. ​

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
एरंडोल | विकासाच्या मुद्द्यावर आमदार अमोल पाटील यांची शहरात भव्य प्रचार रॅली!

एरंडोल | विकासाच्या मुद्द्यावर आमदार अमोल पाटील यांची शहरात भव्य प्रचार रॅली!

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group