अमळनेर, दि. 23 – भाजपाचे दिवंगत नेते स्व.उदय वाघ यांच्या जयंती निमित्ताने आज रोजी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोफत ई-श्रम नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली व भाजयुमोच्या प्रदेश सचिव भैरवी वाघ-पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका व शहर भाजयुमोतर्फे अभियान आयोजित केले होते. अमळनेर शहरातील असंख्य असंघटित कामगार तसेच महिलांनी ई-श्रम कार्ड नोंदणी साठी एकच गर्दी केली होती.
धुळे रोडवरील बाजार समिती समोरील स्व.उदय वाघ यांच्या स्मारकस्थळी अभियान राबविन्यात आले.
दरम्यान,ई-नोंदणी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजप चे शहरातील तसेच ग्रामीण चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.