चाळीसगाव (प्रतिनिधी) : आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षातर्फे चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेत आचारसंहिता लागायची वाट पाहिली जात असताना आमदार मंगेश चव्हाण यांनी यात आघाडी घेतली असून चाळीसगावमध्ये झालेल्या या मुलाखतींना उमेदवारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाशी असलेली निष्ठा आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त केला. नगरपालिका निवडणूक ही सर्वसामान्य जनतेचा आशिर्वाद आणि पक्षनिष्ठ लोकांच्या साथीने लढविण्याचा निर्धार आमदार मंगेशदादांनी यावेळी व्यक्त केला.
“केलेल्या विकासकामांच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादानेच आपल्याला नगरपालिकेत बहुमत मिळवायचे आहे आणि आपल्या चाळीसगाव शहराला उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक १ चे शहर बनवायचे आहे. विकास हाच आपला अजेंडा राहील” असे आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
आगामी काळात विकास निरंतर सुरू ठेवायचा असेल तर चाळीसगाव शहरातील विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व पूर्ण बहुमताने सत्ता येणे गरजेचे आहे, त्यासाठी आम्ही पहिली पसंती ही भारतीय जनता पक्षालाच दिली आहे. पक्षाने संधी दिली तर त्याचे सोने करू जर काही कारणाने पक्षाने संधी नाकारली तर दिलेल्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून मंगेशदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावू असे अनेक इच्छुक उमेदवारांनी ठामपणे सांगितले.










