जळगाव, (प्रतिनिधी) : कामासाठी तिसऱ्या मजल्यावर गेलेल्या खोलीत हेमांगी तुषार अहिरे (वय २२, रा. गोपाळपुरा, जुने जळगाव) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि. २९ ऑक्टोबर) दुपारी उघडकीस आली. विवाहितेच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
 विवाहितेने राहत्या घरात गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामुळे जीएमसी परिसरात मोठी गर्दी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, सपोनि साजीद मन्सुरी यांच्यासह पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
 माहेरच्यांचा आक्रोश..
माहेरच्यांचा आक्रोश..
हेमांगी अहिरे हिने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या माहेरची मंडळी तातडीने रुग्णालयात पोहोचली. मुलीचा मृतदेह पाहताच आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. हेमांगीच्या आत्महत्येमागचं गूढ कायम असून, पोलिस त्या दिशेने अधिक तपास करत आहेत.