• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 23, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

जळगाव, (प्रतिनिधी) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन संगीत मैफलीला जळगावकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. महात्मा गांधी उद्यानात पहाटे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायक व नट डॉ. चारुदत्त आफळे यांनी त्यांच्या नाट्यसंगीत व अभंग वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाची सुरुवात वरुण नेवे यांनी सादर केलेल्या गुरुवंदनेने झाली. त्यानंतर डॉ. रणजीत चव्हाण, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, डॉ. चारुदत्त आफळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मेजर नाना वाणी, विवेकानंद कुलकर्णी व शरदचंद्र छापेकर यांनी कलाकारांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा नाईक गोडबोले हिने केले.

कार्यक्रमात “पंचतुंड नर रुंड माल धर” नांदी, मानापमान नाटकातील गाजलेले पद “चंद्रिका ही जणू”, संत कान्होपात्रा नाटकातील “पतीत तू पावना”, रणदुंदुभी नाटकातील “दिव्य स्वातंत्र्य रवी” आणि देव दिना घरी धावला नाटकातील भावार्थपूर्ण “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी” ही पदे सादर सादर करण्यात आली. सं. मत्स्यगंधा नाटकातील जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केलेले “गुंतता हृदय हे” आणि सं. कट्यार काळजात घुसली नाटकातील “तेजोनिधी लोह गोल ! भास्कर हे गनन राज” व “सुरत पिया की छिन् बिसुराये” या पदांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुमारे दोन तास चाललेल्या या मैफलीची सांगता “सर्वात्मका सर्वेश्वरा” या भैरवीने झाली.

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनीही या मैफलीचा आस्वाद घेतला. अनेक मान्यवरांसह जळगाव शहरातील तमाम रसिक वर्ग या मैफिलीने मंत्रमुग्ध झाला. कै. नथ्थुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य या मैफिलिस लाभले. स्निग्धा कुलकर्णी, प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरूण नेवे, वरूण देशपांडे, अनघा नाईक गोडबोले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Next Post
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group