• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विक्री, व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता: अनुभूती स्कूलच्या ‘दिवाळी मेळा’तून विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेचे धडे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 13, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
विक्री, व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता: अनुभूती स्कूलच्या ‘दिवाळी मेळा’तून विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेचे धडे

जळगाव, (प्रतिनिधी) : अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘दिवाळी मेळा २०२५’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात चिमुकल्यांनी विविध स्टॉल्स व्दारे उद्योजकीय दर्शन घडविले.

दिवाळी मेळ्यात मॉन्टेसरी आणि इयत्ता १ चे विद्यार्थांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ, कला आणि हस्तकला उत्पादने, ग्रीटिंग कार्ड सह अन्य असे क्राऊन कॉर्नर, टेनी टेन्ट, सिंधी प्राऊड, आर दिवाळी किट, फ्रुटि ज्युस, वी-क्री फन अ मैना, क्राफ्ट कॉर्नर, क्युट कॉर्नर अशा २१ स्टॉल्स सादर केले. या उपक्रमातुन मुलांमध्ये वित्तीय साक्षरता, सर्जनशीलता आणि उद्यमशील विचारसरणीला प्रोत्साहन मिळाले.

दीपप्रज्वलनाव्दारे दिवाळी मेळाचे उदघाटन झाले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनिल कांकरिया, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, अंबिका जैन, प्राचार्य मनोज परमार यांची उपस्थिती होती. यावेळी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, शोभना जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, अथांग जैन, अभंग जैन आणि जैन कुटुंबियांची उपस्थिती होते. सोबत पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. सुरवातीला गुरुवंदना व नवकार मंत्र विद्यार्थांनी म्हटला. त्यानंतर प्रेरणादायी नृत्य सादर करून चिमुकल्यांचनी मने जिंकले.

‘दिवाळी मेळा’ साठी सर्व तयारी आणि व्यवस्थापनात विद्यार्थांना पालकांची साथ होती. ‘लकी ड्रॉ’ मधील विजेत्यांना शोभना जैन यांच्याहस्ते पारितोषिक दिले.

मुलांना विविध कौशल्य आत्मसात करता यावे? या उद्देशाने या दिवाळी मेळाचे आयोजन केले होते. यामुळे मुलांना योजना बनवणे, पॅकेजिंग करणे, विक्री करणे, ग्राहकांशी संवाद साधणे यासारख्या व्यावहारिक गोष्टी शिकता आल्यात. प्रत्येक स्टॉलसाठी स्वतःचा ब्रँड नाव आणि लोगो हे विद्यार्थांनी केले होते. या उपक्रमामुळे मुलांमध्ये वित्तीय साक्षरता, सर्जनशीलता आणि उद्यमशील विचारसरणीला विकसित होण्यास मदत झाली. तसेच मुलांमध्ये सहकार्य, जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढला.

दिवाळी मेळा आयोजित करण्याबाबत निशा जैन यांनी सांगितले की, ‘मुलांनी उद्यमशीलतेचे मूलभूत तत्त्व समजून घेतल्यास त्यांच्यात सर्जनशील विचार, जबाबदारीची भावना आणि समस्यांचे समाधान करण्याची क्षमता विकसित होते. ही समज मुलांमध्ये उद्याचे आत्मविश्वासी नेतृत्व विकसीत करण्यास मदत करते; यातुनच दिवाळी मेळाचे आयोजन केल्याचे त्यांनी म्हटले.’

विद्यार्थी आहान यांच्या आई यांनी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. आभार अंबिका जैन यांनी मानले त्यावेळी त्या म्हणाल्या पहिल्यांदा सुरु केलेला आजच्या मेळाचे भव्य स्वरुप पाहता पुढेही असेच उपक्रम सुरु राहतील असे त्या म्हणाल्यात.

प्राचार्य मनोज परमार यांनी सांगितले की, पर्यावरणाचे संतुलित ठेऊन आर्थिक उन्नतीसाठी भविष्यातील उद्योजकीय पिढी तयार करण्याचे कार्य अनुभूती स्कूलव्दारे होत आहे. ‘सार्थक करूया जन्माचे रुप पालटु वसुंधरेचे’ या श्रध्देय भवरलाल जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारसरणीला धरूनच स्कूल तर्फे विविध उपक्रम राबवले जातात.

Next Post
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
विक्री, व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता: अनुभूती स्कूलच्या ‘दिवाळी मेळा’तून विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेचे धडे
खान्देश

विक्री, व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता: अनुभूती स्कूलच्या ‘दिवाळी मेळा’तून विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेचे धडे

October 13, 2025
धक्कादायक: दिराचा भावजयीवर अत्याचार; पती सह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खान्देश

धक्कादायक: दिराचा भावजयीवर अत्याचार; पती सह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group