• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बचतगटांना मिनी ट्रॅक्टरसाठी मिळणार ९० टक्के अनुदान; पात्रताधारकांना अर्ज करण्याचे आवाहन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 30, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
बचतगटांना मिनी ट्रॅक्टरसाठी मिळणार ९० टक्के अनुदान; पात्रताधारकांना अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) : शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी ९० टक्के अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे. या योजने करिता अर्ज करणारे बचतगटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.

बचतगटातील किमान ८०टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचतगटांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या आणि गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बँक खात्यात या योजने अंतर्गत ३ लाख १५ हजार ही रक्कम मिनी टॅक्ट्रर खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येते. मिनी ट्रॅक्टर खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार इतकी राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या १०टक्के हिस्सा स्वतः भरल्या नंतरच ते ९० टक्के अनुदानास पात्र राहतील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेव मंदिर समोर, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन अनिता राठोड, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Next Post
‘गांधीतीर्थ’तर्फे देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न; १९ संघांचा सहभाग

'गांधीतीर्थ'तर्फे देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न; १९ संघांचा सहभाग

ताज्या बातम्या

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
जळगाव जिल्हा

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन
कृषी

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 4, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
आरोग्य

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group