• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अहिराणी कथाकथन व एकपात्री प्रयोगाने रसिक भारावले

भावांजली परिवर्तन महोत्सवाचा आज होणार समारोप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 19, 2021
in मनोरंजन
0
अहिराणी कथाकथन व एकपात्री प्रयोगाने रसिक भारावले

जळगाव, दि. 19 –  संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन आयोजित ‘भावांजली महोत्सवात’ सातव्या दिवशी अहिराणी बोलीतील सादरीकरणाने रसिकांना पोट धरून हसवले. धुळे येथील प्रा योगिता पाटील यांनी ‘तुन्हं मन्हचं तोंड शे’ हे कथाकथन सादर केले. रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या गोष्टींतून त्यांनी माणसांच्या स्वभावाचे चित्रण अचुक उभे केले. या कथाकथनाला विनोदासोबत प्रेक्षकांना भावगंभीर करत विचार करायला लावले. अतिशय सुरेख पद्धतीने योगिता पाटील यांनी हे कथाकथन सादर केले.

यानंतर ‘आयतं पोयतं सख्यानं’ या अहिराणी बोली भाषेतील धमाल विनोद एकपात्री प्रयोग रसिकांना पोट धरून हसवले. खान्देशातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या या भाषेतील गमती जमती, आपल्या बोलीभाषेविषयीचा लोकांच्या मनातील न्युनगंड यावर प्रकाश टाकत बोलीभाषेचा अभिमान बाळगा. मराठी सोबत अहिराणी जगली तरच मराठीही जगू शकते हे त्यांनी पटवून दिले. खान्देशासह महाराष्ट्रभर गाजलेला हा नाट्यप्रयोग अभिनेते प्रविण माळी यांनी सादर केला.

लग्नातील गमती जमती, सुख दुःखाचे प्रसंग रंगवताना त्यांनी आवाजातील बदलांनी संपूर्ण खान्देशाचं दर्शन घडवलं. परिवर्तनच्या भावांजली महोत्सवातील अहिराणी कथाकथन व एकपात्री प्रयोग पहायला प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

कार्यक्रमाला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत सुर्यवंशी, विनोद देशमुख, जेष्ठ पत्रकार हेमंत अलोने प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी महोत्सव प्रमुख अनिल कांकरिया, अनिष शहा, किरण बच्छाव, अमर कुकरेजा, नारायण बाविस्कर, छबिराज राणे उपस्थित होते. सुत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले. महोत्सवाचा समारोप रविवारी होणार असून जळगावकर रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी केले आहे.


 

Next Post
बंगळूर येथील घटनेचा राष्ट्रवादीतर्फे जळगावात निषेध

बंगळूर येथील घटनेचा राष्ट्रवादीतर्फे जळगावात निषेध

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add