जळगाव, दि. 17 – संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन आयोजित भावांजली परिवर्तन कला महोत्सवाच्या सहाव्या दिवशी ‘दास्तान -ए-बडी- बांका’ याचे सादरीकरण झाले. उर्दू व हिंदीमधील पुरातन असा गोष्टी सांगण्याचा हा कलाप्रकार मराठीत आणून अक्षय शिंपी व धनश्री खंडकर यांनी भावांजली महोत्सवात ‘दास्तान -ए-बडी- बांका’चे सादरीकरण केले.
दोन तास चाललेल्या या नाटकाने प्रेक्षकांना आपलंस केलं. सहज सोपं पण प्रवाही सादरीकरण व तितकंच आशयगर्भ होतं. मुंबईच्या गमती व किस्से यातून वेगळ्याच पण अनोख्या मुंबईचं दर्शन या कलावंतांनी घडवलं. परिवर्तनने भावांजली महोत्सवात याचे आयोजन करून जळगावकरांना अतिशय उत्तम नाटक पहायची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दलच्या भावना अनेक रसिकांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमासाठी हे प्रमुख अतिथी होते.
प्रास्ताविक महोत्सव प्रमुख सुनील पाटील, पुष्पा भंडारी, शिरिष बर्वे, रंगकर्मी अनिल कोष्टी, अनील पाटील यांनी केले. तर अनिल कांकरिया, अनिष शहा, अमर कुकरेजा, किरण बच्छाव, छबिराज राणे, नारायण बाविस्कर या महोत्सव प्रमुखांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिक्षा कल्पराज यांनी केले.