जळगाव, (प्रतिनिधी) : दहीहंडीसारख्या पारंपरिक उत्सवात महिलांचा सहभाग वाढावा आणि त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, या उद्देशाने भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावमध्ये यंदाही युवतींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. या दहीहंडीचं हे १७ वं वर्ष असून, ती १६ ऑगस्ट रोजी कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) येथे होणार आहे. महाराष्ट्रात केवळ जळगावमध्येच युवतींसाठी विशेष दहीहंडी आयोजित केली जाते.
या उत्सवासाठी नुकतीच एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर यांची निवड करण्यात आली आहे, तर सचिवपदाची जबाबदारी प्रा. क्षमा सराफ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
समितीतील प्रमुख पदाधिकारी: अध्यक्ष: डॉ. कल्याणी नागूलकर, उपाध्यक्ष: डॉ. अनिता पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, डॉ. कल्याणी मोहरीर, सचिव: प्रा. क्षमा सराफ, स्वागत समिती प्रमुख: डॉ. सोनाली महाजन, लिना पवार, खजिनदार: निलम जोशी, सहसचिव: हर्षाली चौधरी, संध्या कांकरीया, प्रसिद्धी प्रमुख: यामिनी कुळकर्णी, सदस्या: चेतना नन्नवरे, प्रा. श्रीया कोगटा, क्रिस्टाबेल परेरा, मानवी मनोरे हा एक साहसी खेळ असून, त्याला महाराष्ट्र शासनाने अधिकृत दर्जा दिला आहे. त्यामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. जळगावातील सर्व युवतींनी या दहीहंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.