जळगाव, (प्रतिनिधी) : विद्यार्थी आणि पोलिसांमधील संवादाला चालना देण्यासाठी संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘एक राखी सुरक्षितेची, एक राखी सन्मानाची’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थिनींनी पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि दिनेश पाटील यांना राखी बांधून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.
शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले की, मुलांमधील पोलिसांची भीती कमी व्हावी आणि त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर यांनी विद्यार्थिनींना निर्भीडपणे वागण्याचे आवाहन केले आणि कोणत्याही अडचणीच्या वेळी पालक, शिक्षक किंवा पोलिसांची मदत घेण्यास सांगितले.
या कार्यक्रमाला उज्वला नन्नवरे, स्वाती नाईक, कविता सानप, साधना शिरसाट, सरला पाटील, सुवर्णा अंभोरे, शारदा तडवी, सुवर्णा महाजन, दिनेश पाटील आणि निलेश पवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली आव्हाड यांनी केले तर शीतल कोळी यांनी आभार मानले.