जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कानळदा, भोकर, देवगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल, सोमवार ४ रोजी देवगाव येथील महिला शेतकरी इंदुबाई वसंत पाटील यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला केला, ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तातडीने पीडित कुटुंबाला सरकारने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली असून, या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची विनंती केली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, अशोक सोनवणे, प्रमोद घुगे, भीमराव पांडव, हिरालाल सोनवणे, राजू पाटील, विजय लोहार, सचिन चौधरी, नंदलाल सोनवणे (सरपंच, भोकर), प्रभाकर कोळी, किरण ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.