• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शानबाग विद्यालयात ‘गाईड’ एकांकिकेतून विद्यार्थ्यांना विठ्ठल वारीचा भावस्पर्शी अनुभव

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 31, 2025
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
शानबाग विद्यालयात ‘गाईड’ एकांकिकेतून विद्यार्थ्यांना विठ्ठल वारीचा भावस्पर्शी अनुभव

जळगाव, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या विवेकानंद प्रतिष्ठान संचालित शानबाग विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल आणि पंढरपूर वारीचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘गाईड’ ही एकांकिका नुकतीच सादर करण्यात आली. नाट्यरंग जळगाव निर्मित या एकांकिकेच्या सादरीकरणाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पंढरपूर वारीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अनुभवले.

अमोल संगीता अरुण यांनी या एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. सुहास दुसाने आणि अथर्व रंधे या कलावंतांनी आपल्या अभिनयाने बालप्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. एकांकिकेला पियुष भुक्तार यांचे पार्श्वसंगीत लाभले होते, तर दिशा ठाकूर यांनी रंगभूषा व वेशभूषा केली होती. सुयोग राऊत आणि दर्शन गुजराथी यांनी रंगमंचाची उत्तम व्यवस्था सांभाळली.

या नाट्यप्रयोगातून विद्यार्थ्यांना अध्यात्म आणि श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव घेता आला. एकांकिका सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी एकांकिकेतील आशय, भक्तीभाव आणि सादरीकरणाच्या सौंदर्याचे कौतुक केले. शालेय स्तरावर अशा कलाकृती विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीवर सकारात्मक प्रभाव टाकतात, हे या प्रसंगी पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Next Post
क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे होणार उद्घाटन..!

क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे होणार उद्घाटन..!

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group