जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड (MSEB) ऑफिसर्स असोसिएशनच्या जळगाव परिमंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या निवडीमध्ये महेश बुरंगे यांची अध्यक्षपदी, तर देवेंद्र कासार यांची सचिवपदी निवड झाली आहे. संघटना सरचिटणीस संजय खाडे, उपसरचिटणीस प्रणेश शिरसाठ आणि कोषाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे झालेल्या बैठकीत ही महत्त्वपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली.
नवीन कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी असे आहेत:
* उपाध्यक्ष: अक्षय पाडसवान
* कार्याध्यक्ष: गणेश लिधुरे
* सहसचिव: सचिन कोळी, श्रीकांत शास्त्री, राकेश पावरा, प्रशांत सोनार
* कोषाध्यक्ष: देवेश बाविस्कर
* महिला प्रतिनिधी: तन्वी मोरे, निकिता जैन
* प्रसिद्धीप्रमुख: सतीश साळवे
* सल्लागार: मनोज भराडे
नवीन नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या सभासदांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.