• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; १७२ उमेदवारांची प्राथमिक निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगावात रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; १७२ उमेदवारांची प्राथमिक निवड

जळगाव, (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डॉ. केतकी पाटील फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्याद्वारे विविध नामांकित आस्थापनांमध्ये एकूण १७२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आमदार सुरेश भोळे, डॉ. केतकी पाटील, संदीप गायकवाड (सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास), नवनीत चव्हाण (जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी) आदी मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्या करिता हिताची अस्टोमो प्रा.लि. बांभोरी, नोव्हेंचर इलेक्ट्रीकल अॅण्ड डिजीटल सिस्टीम प्रा.लि. जळगाव, नोवेल सिडस, छबी इलेक्ट्रीकल जळगाव, स्पेक्ट्रम प्रा.लि. जळगाव, ऊर्जा हेल्थ केअर, टेक्नोटस्क सोल्युशन, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, उत्कर्ष स्मॉल फायनन्स लि., स्विगी प्रा.लि., जॉन डिअर प्रा.लि. पुणे, मेरिको लिमिटेड, जळगाव अशा आस्थापनांनी ६५५ रिक्त पदांची माहिती दिली. एकूण ३१० उमेदवारांनी सहभाग घेतला असून, त्यापैकी २३५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यामधून १७२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

यावेळी विविध महामंडळांचे माहिती स्टॉल्स देखील लावण्यात आले होते. शासनाच्या योजनांची माहिती देणे, तसेच उमेदवारांना करिअर मार्गदर्शन मिळावे या हेतूने मेळावा उपयुक्त ठरला.

Next Post
‘एक वृक्ष आईच्या नावे’ : मोहाडी टेकडीवर ऑक्सिजन पार्क निर्मितीचा संकल्प

‘एक वृक्ष आईच्या नावे’ : मोहाडी टेकडीवर ऑक्सिजन पार्क निर्मितीचा संकल्प

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group