• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: अट्टल चोरटे जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 19, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: अट्टल चोरटे जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत!

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्यांना मोठ्या शिताफीने अटक करत, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील एकूण ७ गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसमोर, मायटी ब्रदर्स दुकानासमोरून १४ जुलैच्या रात्री ६१,००० रुपये किमतीची फोर्स कंपनीची टेम्पो (एम एच-१९-०६६६) आणि ३०,००० रुपये किमतीचा किर्लोस्कर कंपनीचा ३० किलोवॅटचा जनरेटर, असा एकूण ९१,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी मिलींद मुकुंद थत्ते यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांची धडाकेबाज कारवाई..
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची दोन पथके तयार करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील स.फौ. सुनील पाटील, पो.हे.कॉ. उमेश भांडारकर, पो.हे.कॉ. सतीश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, वीरेंद्र शिंदे, पो.ना. भगवान पाटील, पो.कॉ. अमोल ठाकूर, पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांनी गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला.

आरोपी टेम्पोसह जामनेर, बोदवड मार्गे मलकापूर-नांदुरेकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, एक पथक आरोपींचा पाठलाग करत असताना, आरोपींनी वडनेर भोईजी गावाजवळ अपघात करून वाहन सोडून पळ काढला. अधिक माहिती काढल्यानंतर, आरोपी घटनेच्या काही किलोमीटर अंतरावर एका ढाब्यावर बसलेले आढळून आले. त्यांच्या हावभावावरून आणि अंगावरील जखमांवरून संशय आल्याने, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक आणि मुद्देमाल हस्तगत..
आरोपींची नावे मंगेश सुनील मिस्तरी (वय २०, रा. कांचन नगर, जळगाव, ह.मु. शिरसोली) आणि यश अनिल सोनार (वय २०, रा. समता नगर, जळगाव, ह.मु. शिरसोली) अशी आहेत. त्यांनी जळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून जनरेटर व्हॅन, टाटा एस छोटा हत्ती मालवाहतूक चारचाकी वाहन आणि ५ मोटरसायकल, असा एकूण २,३६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे जळगाव शहर पोलीस ठाण्यातील १, जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील ३, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील २ आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यातील १, असे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची यशस्वी कारवाई स फौ सुनील पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकॉ सतिश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, विरेंद्र शिंदे, दिपक शिरसाठ, पो ना- भगवान पाटील, पो कॉ- अमोल ठाकुर, भगवान मोरे, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार, तसेच नेत्रम येथील कर्मचारी पो कॉ- पंकज खडसे, मुबारक देशमुख यांचा सक्रिय सहभाग होता.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला खिंडार: भडगावात माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला खिंडार: भडगावात माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group