• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

४८ तासांत मंदिरातील दागिन्यांचे चोरटे गजाआड; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 15, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
४८ तासांत मंदिरातील दागिन्यांचे चोरटे गजाआड; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील महादेव मंदिरातील चांदीचा मुकुट आणि इतर दागिन्यांच्या चोरीचा छडा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मुकुंद नगर, लाठी शाळेमागे असलेल्या मानेश्वर महादेव मंदिरातून चांदीचा मुकुट आणि दागिने चोरीला गेल्याची घटना ११ जुलै ला उघडकीस आली होती. मंदिराच्या पिंडीवर असलेले चांदीचे मुकुट आणि दागिने अरुण लक्ष्मण शेटे यांच्या घरी ठेवलेले होते. सण-उत्सवावेळी ते मंदिरात पिंडीला लावले जात असत. फिर्यादी अरुण शेटे हे कुटुंबासह पुणे येथे मुलाकडे गेले असता, अज्ञात चोरट्यांनी घरातून ६१,५०० रुपये किमतीचे चांदीचे मुकुट आणि दागिने चोरून नेले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या चेहऱ्यांवरून आरोपींना ताब्यात घेतले. शाकीब शेख ताजुद्दीन शेख (वय २४, रा. प्लॉट नं. १०, रोकडे कॉम्प्लेक्सजवळ, कासमवाडी, जळगाव) आणि राहुल शेखर रावळकर (वय ३२, रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्या साथीदारासोबत चोरी केल्याची कबुली दिली. चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार, पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकरे, नितीन ठाकूर, आणि राहुल घेटे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ गिरीश पाटील आणि पोकॉ योगेश घुगे हे करत आहेत.

Tags: Crime
Next Post
जळगावात सोनपोत लांबवली, चाकूचा धाक दाखवून १५ हजारांची लूट!

जळगावात सोनपोत लांबवली, चाकूचा धाक दाखवून १५ हजारांची लूट!

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group