• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रामानंद पोलीस स्टेशनचे लोकार्पण संपन्न

जिल्हा पोलीस दलासाठी १६ नव्या जीप; अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
रामानंद पोलीस स्टेशनचे लोकार्पण संपन्न

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, उपअभियंता गिरीश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे भाड्याच्या इमारतीत कार्यरत असलेले हे पोलीस स्टेशन आता सुमारे ४ कोटी रुपये खर्चून अवघ्या १५ महिन्यांत बांधलेल्या स्वतंत्र व ‘कॉर्पोरेट लूक’ असलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी भौतिक सुविधा महत्त्वाच्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बीट हवालदारांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वाहनांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व वेगवान होणार आहे.”

यानंतर जिल्हा पोलीस दलासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या १६ जीप आणि अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहनांचा लोकार्पण समारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. २ कोटी १२ लाख रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचा वापर आजपासून सुरू झाला.

Next Post
बालरंगभूमी परिषदेची ‘दिंडी बालवारकऱ्यांची’ भक्तीमय वातावरणात संपन्न

बालरंगभूमी परिषदेची ‘दिंडी बालवारकऱ्यांची’ भक्तीमय वातावरणात संपन्न

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group