• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या १२ नाटकांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 2, 2025
in जळगाव जिल्हा
0
डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या १२ नाटकांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : व्यावसायिक असो वा हौशी नाटक त्यासाठी मुळात संहिता असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत चांगल्या नाट्यसंहितांची वाणवा असून, जुन्या जाणत्या लेखकांनी केलेले नाट्यलेखन समोर आल्यास, नवलेखकांना त्या सर्जनशीलतेचा वारसा अनुभवता येईल. या वारश्यातूनच उद्याच्या पिढीचे चांगले लेखक तयार होतील, असे प्रतिपादन अद्वैत थिएटर्सचे निर्माते व रंगकर्मी राहुल भंडारे यांनी केले. डॉ. हेमंत कुलकर्णी यांनी पाच दशकांच्या नाट्यकारकिर्दीत लिहिलेल्या २५ नाटकांपैकी निवडक १२ नाटकांचा ३ खंड रुपाने प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

वल्लभदास वालजी वाचनालयाच्या रामनारायण सभागृहात सोमवारी (दि.३०) सायंकाळी ६ वाजता या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.सुशील अत्रे तर प्रकाशक म्हणून अद्वैत थिएटर्सचे निर्माते व रंगकर्मी राहुल भंडारे यांच्यासह लेखक डॉ.हेमंत कुलकर्णी व श्रेयस प्रकाशनाच्या डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन झाल्यानंतर पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ.हेमंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या २५ नाटकातील निवडक १२ नाट्यसंहितांचे तीन खंडात विभागलेल्या या पुस्तकात पहिल्या खंडात ७ आनंदाश्रम, बातमी तशी जुनी पण…, दास्ताँ, हम दो नो, दुसऱ्या खंडात मुसक्या, वेग्गळं असं काहितरी, तेरे मेरे बीच में, नाना भोळे १२ शनिपेठ तर तिसऱ्या खंडात पुन्हा तुर्क पुन्हा अर्क, अघटित, नेने विरुध्द शून्य, अनादी मी या नाटकांचा समावेश होता. तिसऱ्या खंडातील नव्या कोऱ्या प्रयोग न झालेल्या नाटकांविषयी डॉ.हेमंत कुलकर्णी यांनी लेखकाच्या मनोगतात माहिती दिली. यातील ७ आनंदाश्रम, दास्ताँ, तेरे मेरे बीच में, नाना भोळे १२ शनिपेठ या नाटकातून अभिनय करणारे तसेच विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविणारे हास्यजत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील यांनी माहिती दिली तर मुसक्या व वेग्गळं असं काहितरी या नाटकाविषयी रंगकर्मी योगेश शुक्ल आणि हम दो नो, बातमी तशी जुनी पण… या नाटकांविषयी रंगकर्मी अम्मार मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रकाशक म्हणून डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रकाशक राहुल भंडारे यांनी त्यांची नाट्यविषयक वाटचालीबद्दल माहिती देत, नव्या दर्जेदार संहितांची गरज स्पष्ट करत, व्यावसायिक रंगभूमीवर केवळ प्रेक्षकशरण नाटके न होता प्रायोगिक मुल्य असणाऱ्या नाट्यप्रयोगाचेदेखील सादरीकरण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्यासारख्या विविधांगी विषय सखोलतेने मांडणाऱ्या नाट्यलेखकांची रंगभूमीला गरज असल्याचे विषद करत, लवकरच कुलकर्णी सरांचे या नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर होतांना दिसेल अशी आशाही व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रंगकर्मी धनंजय धनगर यांनी केले. या प्रकाशन सोहळ्याला जळगाव शहरातील रंगकर्मी, नाट्यप्रेक्षक व डॉ.हेमंत कुलकर्णी यांचे गेल्या पाच दशकातील नाट्यसहकारी व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

 


Next Post
कुंटनखान्याचा पर्दाफाश, देहविक्री करणाऱ्या महिलांसह ग्राहकही जेरबंद

कुंटनखान्याचा पर्दाफाश, देहविक्री करणाऱ्या महिलांसह ग्राहकही जेरबंद

ताज्या बातम्या

आपत्ती व्यवस्थापनात सर्व यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये काम करावे – मंत्री गिरीश महाजन
महाराष्ट्र

आपत्ती व्यवस्थापनात सर्व यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’ मध्ये काम करावे – मंत्री गिरीश महाजन

July 30, 2025
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमेला सुरुवात; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव जिल्हा

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमेला सुरुवात; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

July 30, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आणि नागपंचमीचा अनोखा संगम
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आणि नागपंचमीचा अनोखा संगम

July 30, 2025
जळगावात यंदा ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे महासंग्राम!
क्रिडा

जळगावात यंदा ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे महासंग्राम!

July 29, 2025
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

July 29, 2025
रावेर पोलिसांची यशस्वी कामगिरी; अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक
खान्देश

रावेर पोलिसांची यशस्वी कामगिरी; अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक

July 29, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group