जळगाव, (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात नुकताच पालक मेळावा पार पडला, ज्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, सखी सावित्री समिती, आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यांसारख्या विविध समित्यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ‘प्लॅस्टिक मुक्ती’ आणि ‘वृक्षारोपण’ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तसेच विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी शाळेतील पालक शिक्षक संघटनेचीही स्थापना करण्यात आली, ज्यात अनेक मान्यवर पालकांनी सहभाग घेतला. पालक-शिक्षक यांच्या सक्रिय सहभागातून शाळेला दहा कचराकुंड्या (डस्टबिन्स) भेट देण्यात आल्या, ज्यामुळे ‘शून्य कचरा’ संकल्पनेला प्रोत्साहन मिळेल.
सभेचे प्रास्ताविक उपशिक्षिका शितल कोळी यांनी केले, तर शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सर्व उपस्थित पालकांचे आभार मानले.