• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोपीनाथराव मुंडे समाजहितैषी लोकनेते, त्यांची आजही उणीव भासते.. – प्रतापराव पाटील

मेहरुण येथे गोपीनाथराव मुंडे यांची जयंती उत्साहात; ढोलताशांच्या गजरात समाज बांधवांचा जल्लोष

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 12, 2021
in सामाजिक
0
गोपीनाथराव मुंडे समाजहितैषी लोकनेते, त्यांची आजही उणीव भासते.. – प्रतापराव पाटील

जळगाव, दि. 12 – लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना कोणताही राजकिय वारसा मिळालेला नव्हता. मुंडे कायम अन्यायाविरूध्द उभे राहिले. राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम त्यांच्यात होता. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला. मुंडे हे समाजहितैषी लोकनेते होते, सर्व राजकीय पक्षांना त्यांची आजही उणीव भासते असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

दिवंगत केंद्रीय मंत्री तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे भव्य रॅली न काढता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर फक्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

जयंती कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, सीमा भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अनंत जोशी, गायत्री राणे, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, उपाध्यक्ष विजय वंजारी, सचिव प्रवीण सानप, मनपा स्थायी समिती सदस्य तथा मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक, माजी नगरसेवक अनिल देशमुख, राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी प्रस्तावना करीत गोपीनाथराव मुंडे यांच्याविषयी माहिती दिली. शिरसोली येथे समस्त लाडवंजारी श्रीराम मंदिर संस्थान यांच्या जागेमध्ये वर्षभरामध्ये समाज बांधवांसाठी लॉन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांनी दिली.

जि.प.सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की, सामंजस्याची भूमिका ठेवणारा नेता म्हणून मुंडे साहेबांची ओळख आहे. ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी मुंडे साहेबांची जयंती आज साजरी होत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांसह समाज बांधवांनी ढोल-ताशांच्या गजरामध्ये जल्लोष करीत गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी केली.

कार्यक्रमासाठी अर्चना नाईक, स्वाती नाईक, मुकेश नाईक, अनील घुगे, भागवत पाटील, संतोष पाटील, योगेश नाईक, एकनाथ वंजारी, धर्मेंद्र नाईक, योगेश लाडवंजारी, राहुल सानप, संतोष ताटे, शेखर लाडवंजारी, रितेश लाडवंजारी, रामेश्वर पाटील, एकनाथ वाघ, वैभव सानप आदींनी परिश्रम घेतले.


 

Next Post
नांद्रा बु. येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

नांद्रा बु. येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add