• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालगंधर्वांना स्वरांजली: जळगावात गुरूवारी विशेष मैफिल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 26, 2025
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
बालगंधर्वांना स्वरांजली: जळगावात गुरूवारी विशेष मैफिल

जळगाव, (प्रतिनिधी) : गंधार कला मंडळ आणि म्हाळस परिवाराच्या वतीने येत्या गुरुवार, २६ जून रोजी “बालगंधर्व एक नक्षत्र” या विशेष मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्वांच्या जयंतीनिमित्त आयोजित ही मैफिल जळगावातील संगीतप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

या मैफिलीत पाचोरा येथील युवा गायिका सिद्धी आणि धनश्री कुलकर्णी या भगिनी आपली कला सादर करतील. त्या शास्त्रीय संगीतासह बालगंधर्वांची काही अजरामर नाट्यगीते आणि अभंग गाऊन मैफिलीला चार चाँद लावतील. सिद्धी आणि धनश्री या दोघीही संगीत विशारद करत असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, धनश्रीने एका स्पर्धेत देशातून प्रथम क्रमांक पटकावून गोल्डन ट्रॉफी आणि ५०,००० रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.

ही मैफिल गुरुवारी सायंकाळी ५ वाजता बळीराम पेठेतील हेमंत म्हाळस, आसरा संकुल, बळीराम मंदिराजवळ येथे होणार आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी बालगंधर्वांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांचे मामा आबासाहेब म्हाळस यांच्या निवासस्थानी गायनाचे धडे गिरवले होते, त्याच ऐतिहासिक ठिकाणी ही मैफिल आयोजित करण्यात आली आहे.
गंधार कला मंडळ आणि म्हाळस परिवाराने जळगावातील सर्व संगीत रसिकांना या मैफिलीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Next Post
भडगावात बॅटरी चोरांना बेड्या: दोघांकडून दुचाकीसह ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त

भडगावात बॅटरी चोरांना बेड्या: दोघांकडून दुचाकीसह ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group