• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जावायाला मुलगा मानून करून दिला दुसरा विवाह ! 

राणे, महाजन, रोटे कुटुंबाचा आदर्शवत निर्णय 

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 11, 2021
in सामाजिक
0
जावायाला मुलगा मानून करून दिला दुसरा विवाह ! 

जळगाव, दि. 11 – मागील वर्षी कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे अनेकांना नातेवाईक व आप्तेष्ट गमवावे लागलेत. बहुतांश जणांचे संसार अर्ध्यावर मोडले. या आघातातून काही कुटुंबे सावरू लागली आहेत. नव्याने संसाराची उभारणी होत आहे. अशा फेरजुळणीत एक आदर्शवत गंधर्व विवाहविधी गुरूवारी भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पार पडला.कोरोना संसर्गामुळे विवाहित कन्येला गमावणाऱ्या पालकांनी जावाई व दोन नातींचे कुटुंब पुन्हा फुलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

भोरगांव लेवा पंचायतीचे कुलसचीव ॲड.संजय राणे यांचे थोरले बंधू मिलिंद मनोहर राणे (रा.अहमदाबाद) यांची कन्या सौ. कोमल हिचा विवाह अहमदाबाद येथील सुजीत दिलीप महाजन यांच्याशी झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गामुळे कोमल हिचे मे महिन्यात निधन झाले. स्व. कोमल व सुजीत यांना उर्वि व चार्वी अशा दोन मुली असून कोरोनाच्या आपत्तीने त्यांच्या संसाराला दृष्ट लागली.

स्व. कोमल हिच्या अकाली निधानानंतर जावाई आणि नातींचे कुटुंब अधुरे झाले. सुजीत यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी ॲड. संजय राणे यांनी कुटुंबात पुढाकार घेत दिलीप महाजन व आजोबा एम. डी. राणे यांनीही हा विचार उचलून धरला. सुजीत हे सुद्धा तयार झाले.

ॲड. संजय राणे व कुटुंबियांनी सुजीत यांना मुलगा मानून त्यांचा दुसरा विवाह जुळवायला प्रयत्न सुरू केले. परिचितांमधून नशिराबाद (ता. जळगाव) येथील विनोद रोटे यांची कन्या लिनाचे स्थळ समोर आले. लिना घटस्फोटीता असून ती सुद्धा दुसऱ्या विवाहास तयार झाली. अखेर राणे-महाजन कुटुंबियांच्या संमतीने रितसर विवाह जुळणी करून सुजीत व लिनाचा गंधर्व विवाह करून लावून दिला. या विवाहाकडे आदर्शवत आणि अनुकरणीय पाऊल म्हणून पाहता येते. जुन्या परंपरा मोडून कुटुंब पुन्हा फुलविण्याचा राणे, महाजन व रोटे कुटुंबाचा हा प्रयत्न समाज परिवर्तनाचा नवा माईलस्टोन रोवणारा असुन समाजासमोर आदर्श घडविणारा आहे.


 

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनला ‘ग्रिहाचा एक्झम्पलरी परफॉर्मन्स पुरस्कार’

गांधी रिसर्च फाऊंडेशनला 'ग्रिहाचा एक्झम्पलरी परफॉर्मन्स पुरस्कार'

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add