• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

शिरसोली रस्त्यावर १३६३ झाडांची यशस्वी लागवड ; पहिला वाढदिवस साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन हिल्स येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जैन हिल्स परिसरात, तसेच जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच सन २०२४-२५ या वर्षात शिरसोली रस्त्याच्या दुतर्फा एकूण १३६३ झाडांची लागवड यशस्वी करण्यात आली आहे. यामध्ये उन्हाळ्यात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा, झाडांचे संगोपन व संवर्धन यांसारखी कामे वेळापत्रकानुसार पार पाडण्यात आली असून, सध्या या झाडांची जिवंत टक्केवारी सुमारे ८५% आहे. या सर्व झाडांचा पहिला वाढदिवस आजच्या जागतिक पर्यावरण दिनी साजरा करण्यात आला.

या उपक्रमात सुरेंद्र वाणी व जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे मोहन गाढे, निलेश चौधरी, राम घोरपडे, इरफान पिंजारी, भूपेश व्यास, सखाराम ठाकरे, रुपेश महाजन, प्रमोद नारखेडे, चेतन महाजन, राजेश चव्हाण, कामिनी धांडे, अजय ढेकळे, आरती व्यास, सुरजकुमार नेमाडे, यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. वन विभागाचे अधिकारी योगेश दीक्षित, उमाकांत कोळी, हरीश थोरात, भागवत तेली, अजय रायासिंग, गोकुळ सपकाळे आणि सामाजिक वनीकरण विभागातील रोहिणी थोरात यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या परिसरात वन्यप्राणी आणि वृक्ष संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले. हरित सेना प्रमुख प्रवीण पाटील, प्राध्यापक शिवराज पाटील, तसेच महापालिका कर्मचारी वसंत पाटील यांनी निमखेडी रस्त्याच्या दुतर्फा आणि परिसरातील मोकळ्या जागांमध्ये वृक्ष लागवड केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोहन गाढे यांच्या हस्ते हेलिपॅड परिसर आणि गौराई ग्राम उद्योग जवळील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी जळगाव सायकलिस्ट ग्रुप, हरित सेना, वन विभागाचे कर्मचारी आणि सुरेंद्र वाणी तसेच गांधी रिसर्च फाउण्डेशनचे समन्वयक उदय महाजन, अब्दुल भाई, गिरीश कुलकर्णी, जैन इरिगेशनच्या गार्डन विभागाचे अजय काळे, राजेंद्र राणे, व गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे वितरित करण्यात आली.

गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र नेटके, भागवत तेली, राम घोरपडे आणि मोहन गाढे यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. राजेंद्र राणे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे विक्रम अस्वार, प्रशांत सूर्यवंशी, प्रसाद सोनवणे, प्रकाश बारी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण उपक्रम..
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून २०२५ रोजी जैन प्लास्टिक पार्क, बांभोरी येथे आत्मन जैन व अभंग जैन यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम झाला. पर्यावरण रक्षणाच्या हेतूने आयोजित या उपक्रमात कंपनीतील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमात डॉ. जनमेजय नेमाडे, सी. एस. नाईक, अतिन त्यागी, आर. व्ही. सरोदे, आर. एस. पाटील, डॉ. योगेश. डी. बाफना यांची उपस्थिती लाभली. आरंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या झाडांचे रोपे लावण्यात आले. पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी, हरित क्षेत्र वाढवण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी शुद्ध वायू निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला.

 


Next Post
महाजन नगरात अग्निवीर चारुदत्त विसपुतेचे ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत!

महाजन नगरात अग्निवीर चारुदत्त विसपुतेचे ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत!

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलाचा विवस्त्र व्हिडीओ व्हायरल; दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गुन्हे

अल्पवयीन मुलाचा विवस्त्र व्हिडीओ व्हायरल; दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

July 13, 2025
प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group