जळगाव, (प्रतिनिधी) : लोकनेते, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव शहरातील मेहरुण येथे त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. वंजारी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक आणि श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी माजी महापौर सीमा भोळे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, कैलास सोनवणे, सरिता माळी, शोभा चौधरी, मनीषा पाटील, अशोक लाडवंजारी, राजेंद्र घुगे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यासह सोमनाथ पाटील, विनोद मराठे, ज्ञानेश्वर नाईक, राजेंद्र भागवत पाटील, अनिल घुगे, योगेश घुगे, सुधीर नाईक, महादू सोनवणे, संतोष घुगे, किशोर ढाकणे, भाग्येश ढाकणे, गजानन वंजारी, हर्षल ढाकणे, कल्पेश वाघ, आशुतोष पाटील, पप्पू पाटील, राजू खुरपडे, संतोष चाटे, सुनिल नाईक, नामदेव नाईक, प्रकाश लाडवंजारी, किशोर देविदास पाटील, हेमंत नाईक, राहुल लष्करे, सचिन ढाकणे, उमेश आंधळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकनेत्याच्या स्मृतींना अभिवादन केले.
उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याला उजाळा दिला आणि त्यांच्या विचार व आदर्शांचे स्मरण केले. त्यांच्या दूरदृष्टीने आणि जनसेवेच्या भावनेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे योगदान दिले, असे मत अनेकांनी व्यक्त केले.