• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्रामपंचायत अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात ! ; ४० हजारांची लाच घेताना थरार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 21, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
ग्रामपंचायत अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात ! ; ४० हजारांची लाच घेताना थरार

अमळनेर, (प्रतिनिधी) : शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून टक्केवारीच्या हिशोबाने ४० हजारांची रोकड लाच म्हणून स्विकारतांना तामसवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धुळे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करत रंगेहात पकडले. लाच घेण्यासाठी या अधिकाऱ्याने अमळनेरच्या आठवडे बाजारात तक्रारदाराला ४ ते ५ वेळा फिरविले. नंतर रोकड घेऊन दुचाकीवरून पसार झाला. मात्र धुळे एसीबीच्या पथकाने पाठलाग करून या अधिकाऱ्याला अटक केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दिनेश वासुदेव साळुंखे (वय ५३ रा. कॉटन मार्केटजवळ, अमळनेर) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे ५ लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाचे ४ लाख रुपयांचे बिल तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा झाले होते. सुमारे सात दिवसांपूर्वी तक्रारदार आणि त्यांचे चुलत काका, त्यांच्या दुसऱ्या कामाची चौकशी करण्यासाठी तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी दिनेश साळुंखे यांनी त्यांना अदा केलेल्या बिलाच्या १० टक्के म्हणजेच ४० रुपये लाचेची मागणी केली.

ही बाब तक्रारदाराने तात्काळ दूरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली. माहिती मिळताच, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पारोळा येथे जाऊन तक्रारदाराची भेट घेतली आणि त्यांची तक्रार नोंदवून घेतली. १९ मे रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, दिनेश साळुंखे यांनी पुन्हा ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सापळा रचल्यानंतर, साळुंखे यांनी अंमळनेर येथे दगडी दरवाजासमोर, आठवडे बाजारात राजे संभाजी चौकात ही लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली आणि दुचाकीवरून पळ काढला. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. साळुंखे यांचा मोबाईलही ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई हि धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक रूपाली खांडवी, पो.हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल यांनी केली आहे.

 


Tags: Crime
Next Post
नवविवाहित रिक्षाचालकाचा अपघातात मृत्यू, अमळनेर तालुक्यात शोककळा

नवविवाहित रिक्षाचालकाचा अपघातात मृत्यू, अमळनेर तालुक्यात शोककळा

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group