• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ट्रॅक्टर उलटून तरुण चालकाचा जागीच मृत्यू ; आंबीलहोळजवळ भीषण अपघात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
ट्रॅक्टर उलटून तरुण चालकाचा जागीच मृत्यू ; आंबीलहोळजवळ भीषण अपघात

जामनेर | फराज अहमद, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील एमआयडीसी खादगाव ते आंबीलहोळ रस्त्यावर आज मंगळवारी दि. २० मे रोजी दुपारी ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन खोल खड्यात कोसळले. या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरच्या खाली दबून जागीच मृत्यू झाला.

गुलाब जमा चव्हाण (वय ३५,रा.आंबीलहोळ ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई, वडील, पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होता. ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी गुलाब चव्हाण हे कामावर गेले होते. तेथे ट्रॅक्टर घेऊन जात असताना ट्रॅक्टर उलटल्यामुळे गुलाब चव्हाण हे वाहनाबरोबर खालच्या खड्यात पडले. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर थेट त्यांच्या अंगावर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आरोग्यदूत जालमसिंग राजपूत, कैलास पालवे, बाळू चव्हाण, नटवर चव्हाण आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. गंभीर अवस्थेत असलेल्या चालकाला उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे तातडीने हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. या घटनेमुळे अंबिलहोळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Tags: accident
Next Post
सोमवारी मिळणार दहावीची गुणपत्रिका ; विद्यार्थी-पालकांनी नोंद घ्यावी

सोमवारी मिळणार दहावीची गुणपत्रिका ; विद्यार्थी-पालकांनी नोंद घ्यावी

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group