• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावमध्ये ‘मॅंगो फिस्टा’: देशी-विदेशी आंब्याचा शाही मेळावा

१५० हून अधिक वाणांचा समावेश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 21, 2025
in कृषी, जळगाव जिल्हा
0
जळगावमध्ये ‘मॅंगो फिस्टा’: देशी-विदेशी आंब्याचा शाही मेळावा

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० हून अधिक जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योगच्या दालनात आयोजित केले आहे. ‘मॅंगो फिस्टा’ हे प्रदर्शन दि.२१ ते २२ दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. २१ रोजी सकाळी १० वाजता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विशेष म्हणजे या दोन दिवसात प्रदर्शनावेळी आंब्यापासून तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद ‘देशी ब्लिस’ येथे घेता येणार आहे.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. (JISL) या आघाडीच्या कृषी कंपनीकडून आंबा उत्पादनक्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. आंब्याच्या उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी उच्च घनता व अतिउच्च घनता लागवड पद्धती, ठिबक सिंचन व खतसिंचनाचा वापर आदी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रयोग यशस्वी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे कंपनीकडून भव्य ‘जैन आंबा प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात देश-विदेशातून आणलेले आणि जैन इरिगेशनने स्वतः विकसित केलेले १५० पेक्षा अधिक आंबा वाण / जनुकप्रकार प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये १० विदेशी व ३० नवे संकरित वाणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे सर्व वाण जैन हिल्स येथील बागायत प्रयोगशाळांमध्येच पिकवलेले आहेत.

जैन इरिगेशनच्या संग्रहात एकूण १६० वाणांचे संकलन आहे, त्यापैकी ८० वाणांचे प्रदर्शन या ठिकाणी आहे. तसेच, संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ८०० हून अधिक संकरित वाणांपैकी ३० वाणांचे परीक्षणासह सादरीकरण यामध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनात काही वाणांचे फळ १ किलोपर्यंत वजनाचे, काही वाण अतिशय गोड चव असलेले, तर काही लालसर किंवा गडद पिवळ्या रंगात लाल छटा असलेले आहेत, जे अत्यंत स्वादिष्ट, देखणे व आकर्षक आहेत.

विदेशी वाणांमध्ये ऑस्ट्रेलियाचे किंगस्टन प्राईड, पामेर, ऑस्टिन, फिलिपाईन्सचा कॉरोबो, अमेरिकेचे केंट व टॉमी अटकिन्स, थायलंडचा किंगफॉन, आणि इस्राईलचा माया यांचा समावेश आहे. विविध नावाजलेल्या संस्थांनी विकसित केलेल्या रत्ना, मल्लिका, सोनपरी यांसारखे दर्जेदार वाण देखील प्रदर्शनात आकर्षण ठरू शकतील.

या प्रदर्शनात केवळ विविध आंबा वाण पाहण्यासाठीच नव्हे तर आंबा क्षेत्रातील तज्ज्ञांद्वारे सविस्तर माहिती मिळवण्याची संधीही मिळणार आहे. जैन इरिगेशनच्या या उपक्रमामुळे शेतकरी, बागायतदार, संशोधक तसेच आंबा रसिक यांना आंबा उत्पादनाच्या नव्या वाटा व शक्यता समजून घेता येणार आहेत. ‘मँगो फिस्टा’ प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आवाहन शिरसोली रोडवर असलेल्या गौराई ग्रामोद्योग मॉलतर्फे केले आहे.

 


 

Next Post
ट्रॅक्टर उलटून तरुण चालकाचा जागीच मृत्यू ; आंबीलहोळजवळ भीषण अपघात

ट्रॅक्टर उलटून तरुण चालकाचा जागीच मृत्यू ; आंबीलहोळजवळ भीषण अपघात

ताज्या बातम्या

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group