• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा

लेखापरिक्षण केलेले चौथ्या तिमाहीसह वार्षिक निकाल जाहिर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा

जळगाव, (प्रतिनिधी) : मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि इतर कृषी निविष्ठा यांच्या उत्पादनामध्ये गुंतलेलल्या जगातील दुसऱ्या व भारतातील सगळ्यात मोठ्या ठिंबक सिंचन प्रणालीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीचे ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि वर्षाचे लेखापरीक्षण केलेले (ऑडिटेड) Consolidated आणि Standalone निकाल जाहीर करण्यात आले. यात कंपनीला वर्षाच्या एकत्रित करपश्चात नफा २५.७ कोटी रूपये झाला आहे.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव येथे आज दि. १४ ला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथी तिमाही आणि आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण मंजूर करण्यात आले. जैन इरिगेशन कंपनीने वर्षाचे एकत्रित उत्पन्न ५७७९.३ कोटी रूपये नोंदवले गेले. इबिडा ७१६.८ कोटी रूपये नोंदवला. तर वर्षाचा एकत्रित करपश्चात नफा २५.७ कोटी रूपये झाला. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या वर्षाचे स्वतंत्र उत्पन्न ३२५९ कोटी रूपये झाले. तर चौथ्या तिमाहीतील स्वतंत्र उत्पन्न १०२७.३ कोटी रूपयांवर पोहोचले.

याबाबत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी माहिती दिली आहे. “२०२४-२५ आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीने एकूण महसुलात १.३ टक्के सुधारणा करत स्थिर कामगिरी नोंदवली. संपूर्ण वर्षात महसूलात झालेली घट प्रामुख्याने देशांतर्गत व्यवसायामुळे झाली. मात्र, कामकाजातील रोख प्रवाहात (कॅश फ्लोमध्ये) लक्षणीय सुधारणा झाली असून हे कार्यक्षम खेळत्या भांडवलाच्या व्यवस्थापनामुळे शक्य झाले आहे. आम्ही विशेषतः पाईपिंग, हाय-टेक अॅग्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या आमच्या मुख्य व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत आहोत. पुढील काळात सरकारच्या पायाभूत सुविधा खर्चामुळे आणि स्थिर कृषी उत्पादनामुळे आम्हाला किरकोळ मागणीत पुनरुज्जीवन होईल अशी अपेक्षा आहे. आमचे लक्ष्य कर्ज कमी करणे, खेळते भांडवल कार्यक्षम करणे आणि रोख प्रवाह (कॅश फ्लो) सुधारणा करणे आहे, असेही अनिल जैन यांनी सांगितले.

 


 

Next Post
तरूणाने केले विषप्राशन ; उपचारादरम्यान मृत्यू

तरूणाने केले विषप्राशन ; उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!
खान्देश

कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group