• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

स्कूलचे यंदाही १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 14, 2025
in शैक्षणिक
0
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही १०० टक्के निकाल लागला. सर्वच्या सर्व विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

मोहित गजानन पाटील, प्रेम विनोद पावसे हे दोघं प्रथम (९२.००%), जान्हवी प्रदीप सोनवणे, रिया एकनाथ नेमाडे दोघंही-द्वितीय (९१.६० %) व मिताली सुकलाल नाथ, घोषिता जयंत पाटिल दोघंही – तृतीय (९१.००%), भावेश विकास गरूड – चतुर्थ (९०.८०%), धिरज विकास पाटील – पाचवा (९०.६०) उत्तीर्ण झालेत. गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी अभिनंदन केले. १६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेत. १० विद्यार्थी ९० टक्केच्या वर गुणप्राप्त केले. तर उर्वरीत विद्यार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.

◾आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थिती असतानाही चिकाटीने अभ्यास करून यश प्राप्त केल्याने अनुभूतीच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतूक आहे. स्कूलच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत सातत्याने शाळेचा १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राखल्याने शिक्षकांसह सहकाऱ्यांचेही अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी व्यक्त केली.

आईच्या खडतर प्रवासाला स्कूलमधून पहिला येऊन मोहितने दिला आनंद..
वडीलांचे कोरोनामुळे निधन झाले आई शिवणकाम करून संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाहाची व्यवस्था करते. आजोबा साथीला आहेच मात्र बहिण भार्गवी सह कुटुंबाचा गाडा पुढे नेताना आई-आजोबांना तारेवरची कसरत करावी लागते. आता आई शिवणकामासह आशा वर्करचे काम करते. दोघांच्या खडतर प्रवासाची जाणिव असून अनुभूती स्कूलमधून प्रथम आल्याने त्यांना आनंदाची अनुभूती देता आली हेच माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. अशी प्रतिक्रिया पहिला आलेला मोहित पाटील ने दिली.

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल मुळे आमचे कार्यसिद्धीस झाले अशी प्रतिक्रिया अंध फिजिओथेरपी करणाऱ्या जयंत पाटील यांची आहे. आपल्या कन्येने मिळविलेल्या यशाबद्दल आम्ही आनंद आहेच, समाजातील वंचित गरजू घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना घडविण्याचे काम भवरलाल जैन यांनी केले तेच काम अशोकभाऊ पुढे घेऊन जात आहे. तृतीय आलेल्या कु. घोषिता पाटील चे स्वप्न स्पर्धा परिक्षा देऊन मोठं अधिकारी होण्याचं आहे. दहावीत शिक्षकांनी विशेष क्लास घेऊन अभ्यास घेतला त्यामुळे आम्हाला यशस्वी होता आले, अशी प्रतिक्रीया घोषिता ने दिली.

स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या रिया चे वडीलांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. अशा प्रकारे परिस्थितीशी दोन हात करून अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.


Next Post
पावणेदोन लाखांची तांब्याची तार चोरी प्रकरणी दोघांना अटक

पावणेदोन लाखांची तांब्याची तार चोरी प्रकरणी दोघांना अटक

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group