• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

७ व्या खेलो इंडिया क्रीडा-२०२५ स्पर्धेत सायकलपटू आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश

मुलींच्या गटात सुवर्ण, कांस्य, रौप्य पदकांची कमाई करून महाराष्ट्राचे नाव उंचावले

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 10, 2025
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
७ व्या खेलो इंडिया क्रीडा-२०२५ स्पर्धेत सायकलपटू आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश

जळगाव, (प्रतिनिधी) : दिल्ली येथे झालेल्या ७ व्या खेलो इंडिया क्रीडा- २०२५ स्पर्धेत ट्रॅक सायकलिंग प्रकारात स्क्रॅच रेसमध्ये कांस्य, टाईम ट्रायल प्रकारात रौप्य पदकासह, स्प्रिंट प्रकारात सुवर्ण पदकासह, केरिन या सायकलिंग प्रकारात स्पर्धात्मक वेळ नोंदवून आकांक्षा गोरख म्हेत्रे हिने तिहेरी यश मिळविले आहे. जळगावची सायकलपटू आकांक्षा हिने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले असून बिहार मध्ये दि. १३ ते १४ मे ला होणाऱ्या स्पर्धेत दिमाखात ती सहभागी होणार आहे.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ ट्रॅक सायकलिंग प्रकारात झालेल्या या स्पर्धेत २१ राज्यांतील सायकलपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. दि. ६ ते ८ मे दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात आली. यात जळगावच्या आकांक्षा म्हेत्रे ने मुलींच्या ७.५ किलो मीटरच्या स्क्रॅच रेस मध्ये ११ मिनिटे ५१.६४९ सेकंद वेळ नोंदवून कांस्य पदकाला गवसणी घातली. टाईम ट्रायल प्रकारात ३८ मिनिटे ७४२ सेकंद वेळ नोंदवून रौप्य पदक मिळवून दोन पदकांची कमाई केली. पहिल्या दिवशी मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी स्प्रिंट प्रकारात वेग व क्षमतेच्या जोरावर सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच तिला शेवटच्या दिवशी केरिन या सायकलिंग प्रकारात अतिशय अटीतटीच्या तिनही फेऱ्यांमध्ये स्पर्धात्मक वेळ नोंदवून झालेल्या अंतिम फेरी मध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ट्रॅक सायकलिंगमध्ये मिळालेल्या यशाच्या जोरावर आकांक्षा म्हेत्रे ही बिहार मधील पटणा येथे दि. १३ ते १४ दरम्यान होणाऱ्या रोड सायकलिंग मध्ये आपला उंचावलेल्या आत्मविश्वासाने सहभागी होत आहे.

महाराष्ट्राला सायकिलिंगमध्ये पदके जिंकून देणारी आकांक्षा ही मूळची जळगावची असून जैन इरिगेशनचे सहकारी गोरख म्हेत्रे, अंजली म्हेत्रे यांची कन्या आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांच्यासह परिवाराने कौतूक केले आहे.

Tags: #sports
Next Post
कार अपघातात पिता ठार, मुलीसह दोघे जखमी ; जळगावच्या रामेश्वर कॉलनीत शोककळा

कार अपघातात पिता ठार, मुलीसह दोघे जखमी ; जळगावच्या रामेश्वर कॉलनीत शोककळा

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group