जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव लोकसभा मतदार संघातील ६० वर्षावरील व्यक्तीसांठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत साहित्य उपलब्धतेसाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण संस्था (अलिम्को) मुंबई व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विदयामाने ८ ते १६ मे, २०२५ दरम्यान जळगाव शहर व ग्रामीण क्षेत्रासाठी ८ मे, २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून उर्वरित तालुक्याच्या ठिकाणी संबधीत तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
एरंडोल- दि.९ मे २०२५, पारोळा – दि.१० मे २०२५ , अंमळनेर- दि.१२ मे २०२५, धरणगाव- दि.१३ मे २०२५, पाचोरा- दि. १४ मे २०२५ ,भडगाव- दि. १५ मे २०२५, चाळीसगाव- दि.१६ मे २०२५ अशा प्रकारे आयोजन असून शिबीरात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत ६० वर्षावरील वयोवृध्द व्यक्तींना कर्णयंत्र, व्हिल चेअर, कमोड चेअर, नी ब्रेस, वॉकींग स्टीक, ट्रीपॉड, वॉकर, कृत्रीम दात, चष्मे, इ. सहाय्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
वरील प्रमाणे आयोजित शिबीरास संबधीत तालुक्यातील व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो इ. कागदपत्राची झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. असे जिल्हा समाकल्याण अधिकारी विजय राससिंग जिल्हा परिषद जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.