• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्रीमद् भागवत कथा दुःख नष्ट करणारे अमृत.. – ज्ञानेश्वर महाराज

मेहरुण येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेचा उत्साहात समारोप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 2, 2021
in धार्मिक
0
श्रीमद् भागवत कथा दुःख नष्ट करणारे अमृत.. – ज्ञानेश्वर महाराज

जळगाव, दि. 02 – संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून श्रीमद भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे मार्गदर्शन हभप ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी मेहरुण येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथा समारोप प्रसंगी केले. प्रसंगी श्रीमद् भागवत ग्रंथाची दिंडी भाविकांच्या उत्साहात काढण्यात आली. रात्री काल्याचे किर्तन होऊन सप्ताहाचा समारोप झाला.

मेहरुण येथील संत ज्ञानेश्वर चौकांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह कथा संगीतमय भागवत कथेचे दि. २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचे एकविसावे वर्ष होते.

गुरुवारी सप्ताहाचा समारोप झाला. सकाळी संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा समारोप प्रसंगी ह भ प ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी भाविकांना प्रबोधित करीत भागवत कथेचा अखेरचा अध्याय समजावून सांगितला. भागवत कथेतून जीवनाचे सार कसे मिळतात ते स्पष्ट करून दिले. यावेळी भाविकांच्या उत्साहामध्ये अखेरच्या दिवशी देखील खंड पडला नाही.

भगवंतांचे स्वरूप दर्शविण्याचे आणि भगवत तत्त्वाचा निर्देश करण्याचे काम भागवत करते. जी व्यक्ती भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज यांनी केले. प्रसंगी आ.सुरेश भोळे, माजी महापौर नितीन लढढा, नगरसेवक कैलास सोनवणे, महानगरपालिकाचे तिन्ही उपायुक्त शाम गोसावी, प्रशांत पाटील, पवन पाटील, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, शोभा चौधरी, सरिता माळी कोल्हे, अमोल कोल्हे, स्थायी समिती सदस्य तथा मेहरुण प्रभागातील नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते.

दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर चार वाजता श्रीमद् भागवत कथेची दिंडी भाविकांच्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. महिला भाविकांनी मंगलकलश घेऊन लक्ष वेधून घेतले होते तर लहान मुलांचा देखील लक्षणीय सहभाग होता. दिंडी मेहरुण परिसरामध्ये काढण्यात आली. ठिकठिकाणी दिंडीचे फुलांच्या वर्षावामध्ये स्वागत करण्यात आले.

दिंडीत भगवंतांच्या नावाचा जयघोष करीत भाविकांनी टाळ मृदुन्गाच्या निनादात मेहरुण परिसर दुमदुमून टाकला. संत ज्ञानेश्वर चौकात दिंडीचा समारोप झाला. रात्री ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर या सप्ताहाचा व कथा सोहळ्याचा समारोप झाला.

सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरुण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, जय दुर्गा ग्रुप, साईदत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना तसेच श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी आणि मेहरुण ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


Next Post
तायक्वांदो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटीलला सुवर्ण

तायक्वांदो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटीलला सुवर्ण

ताज्या बातम्या

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!
खान्देश

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

October 17, 2025
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group