जळगाव, (प्रतिनिधी) : परिवर्तनने ‘आखाजी पहाट’ हा उपक्रम सुरू करून एक नवी सुरुवात केली आहे. परिवर्तनचा कोणताही कार्यक्रम म्हणजे उन्हाळ्यातही गारवा देणारा मनाला प्रसन्न करणारा असतो. सतत नाविण्याचा शोध ही परिवर्तनची ओळख आहे. परिवर्तनची आखाजी पहाट देशातील पहिली आखाजी पहाट आहे . एका नव्या सांस्कृतिक पर्वाची सुरवात परिवर्तन ने केली आहे. अशा शब्दात आ. राजूमामा यांनी दिवाळी पहाटचे व परिवर्तनचे कौतुक केले.
याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रवीण कुमार सिंग, डॉ. रेखा महाजन, डॉ. गोपाळ घोलप, दुष्यंत जोशी, मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. खानदेशाचे पारंपरिक प्रतीक असलेल्या आखाजीला भरल्या जाणाऱ्या घागरीची पूजा करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मंत्रोच्चारात मान्यवरांनी पूजन केले. दिवाळी पहाट कार्यक्रमाची सुरुवात विठू माऊली तु माऊली जगाची ने झाली. कार्यक्रमात अवघा रंग एक झाला, अरे अरे ज्ञाना, लख्ख पडला प्रकाश, अबीर गुलाल, उंच उंच झोका , मुंजा, वही गायन , गोंधळ, अभंग, लोकगीत असे विविध संगीत प्रकार सादर झाले.
श्रद्धा पुराणीक कुलकर्णी, अंजली धुमाळ, शरद भालेराव, जयेश महाजन या गायकांनी गाणी गायली. तर मंजुषा भिडे, अंजली पाटील, हर्षल पाटील यांनी कवितांचे सादरीकरण केले. शंभू पाटील यांनी भारतीय परंपरा, खानदेशी संस्कृती त्यातील आखाजीचे, अक्षय तृतीयेचे महत्त्व सांगताना प्रेम निर्माण करणारा सण असून कृषी परंपरेतील राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसांच्या भूमी आहे. आखाजीला असलेलं अपरंपार महत्व निवेदनातून अधोरेखित केले.
मुकेश खैरे, रोहित बोरसे, यश महाजन, मुकुंदराव भालेराव या वादकांनी कार्यक्रमात रंग भरले. कार्यक्रमाचे निर्मिती प्रमुख मोना निंबाळकर व अक्षय नेहे हे होते तर संकल्पना सुनील बारी यांची होती. मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरील सिंग राजपूत भगवान भोई मंगेश कुलकर्णी , विनोद अजनाडकर, भाऊसाहेब पाटील आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला यात आणि काम करूया माजी कुलसचिव डॉ. किशोर पवार जेष्ठ गायक दुष्यंत जोशी भागवत पाटील, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.