• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

२४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू ; चोपडा तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
२४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू ; चोपडा तालुक्यातील घटना

चोपडा, (प्रतिनिधी) : शेतातील लोकल लाईनचा तार जोडण्यास गेले असता तालुक्यातील वढोदा येथील २४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दीपक तुकाराम पाटील (वय २४, रा. वढोदा ता. चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील तुकाराम पाटील व आई छोटाबाई पाटील हे शेत मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. तर त्यांचा एकुलता एक मुलगा दीपक याने उच्च शिक्षण घेत तो गावातील शेत पंपाच्या दुरुस्तीचे काम करत होता. वढोदा येथील रहिवासी व सनपुले येथील आश्रम शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर गोरख पाटील यांच्या वढोदा शिवारात शेतातील शेत पंपाचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो सुरळीत करण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील हे दीपक पाटील यांना शेतात घेऊन गेले.

या वेळी दीपक वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढला असता त्याला जबर शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर नातेवाईकांनी दीपकला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. मनमिळाऊ दीपकचा दुर्दैवी अंत झाल्याने पाटील परिवाराला धक्का बसला आहे. या घटनेमुळे वढोदा गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
‘आखाजी पहाट’ कार्यक्रमाचे परिवर्तन तर्फे आयोजन ; रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

'आखाजी पहाट' कार्यक्रमाचे परिवर्तन तर्फे आयोजन ; रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group