• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ऑनर किलींग : पोलीस पित्याच्या गोळीबारात मुलीचा मृत्यू, जावई गंभीर जखमी

प्रेम विवाह केल्याच्या रागातून घडली घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 27, 2025
in गुन्हे
0
ऑनर किलींग : पोलीस पित्याच्या गोळीबारात मुलीचा मृत्यू, जावई गंभीर जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : चोपडा शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथे हळदीच्या कार्यक्रमात प्रेमविवाह केल्याच्या रागातून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पित्याने मुलगी व जावईवर गोळीबार गेला. यात मुलीचा मृत्यू झाला असून जावई गंभीर जखमी झाला आहे. तर उपस्थित नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या मुलीच्या पित्याला पब्लिक मार दिल्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृप्ती अविनाश वाघ (वय २५, रा.डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे) असे मयत तरुण विवाहितेचे नाव आहे. तर तिचे पती अविनाश ईश्वर वाघ (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहे. मयत तृप्ती वाघ हिच्या सासू प्रियंका ईश्वर वाघ (वय ४५ रा. पुणे) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी शनिवारी पुण्यातून अविनाश वाघ व त्याचा परिवार आला होता. याबाबतची माहिती संशयित आरोपी तथा अविनाश वाघ यांचे सासरे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी किरण अर्जुन मंगळे (वय ५५ रा. शिरपूर जि. धुळे) यांना मिळाली होती. त्यांनी चोपडा येथे येऊन शनिवारी दि. २६ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास मुलगी तृप्ती वाघ व जावई अविनाश वाघ यांच्यावर परवाना असलेल्या बंदुकीतून बेछूट गोळीबार केला.

यात मुलगी तृप्ती वाघ ही जागीच मृत्युमुखी पडली तर जावई अविनाश याला पाठीवर व हातावर गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी संतप्त होऊन संशयित आरोपी किरण मंगळे याला बेदम मारहाण करून पब्लिक मार दिला. चोपडा शहर पोलिसांना घटनेची माहिती करताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी तृप्ती वाघ हिचा मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला तर जावई अविनाश वाघ व जखमी किरण मंगळे यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2025/04/VID-20250427-WA0021.mp4

प्रियंका ईश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किरण अर्जुन मंगळे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा निखिल किरण मंगळे (वय २२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेमुळे चोपडा शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे स्वतः करीत आहेत.

Tags: #ownerkillingchopdaCrimePolice
Next Post
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा जप्त

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा जप्त

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group