• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फुकट्या रेल्वे प्रवाशांवर धडक कारवाई ; भुसावळ विभागात ६ लाख १८ हजारांचा दंड वसूल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
फुकट्या रेल्वे प्रवाशांवर धडक कारवाई ; भुसावळ विभागात ६ लाख १८ हजारांचा दंड वसूल

भुसावळ, (प्रतिनिधी) : वाढत्या गर्दीचा फायदा घेत अनेक फुकटे प्रवासी जनरल तसेच स्लीपर डब्यातून प्रवास करीत असल्याने अशा प्रवाशांवर डीआरएम ईती पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाद्वारे सातत्याने कारवाई केली जात आहे. विशेष पथकातील टीटीआय निसार खान यांनी दि. १३ ते १७ एप्रिल दरम्यान ४५४ प्रकरणांद्वारे ६ लाख १८ हजारांचा दंड वसुल करीत विक्रम प्रस्थापीत केला आहे.

भुसावळातील भरारी पथकातील टीटीआय निसार खान यांनी यापूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी एकाच दिवशी २२७ प्रवाशांवर कारवाई करीत २ लाख १ हजार ७५० रुपयांचा तर १ मार्च २०२५ रोजी १७९ प्रकरणात १ लाख ५३ हजार ७०० रुपये दंड वसुल करीत नवा विक्रम प्रस्थापीत केला होता. तर दि. ७ व ८ एप्रिलला ११२ प्रवाशांवर कारवाई करीत १ लाख ४२ हजारांचा दंड वसुल केला होता. त्यानंतर १३ एप्रिल रोजी २१५ प्रकरणांच्या माध्यमातून २ लाख ७४ हजार १५ रोजी १२५ प्रकरणात १ लाख ४० हजार तर १६ एप्रिल रोजी २ लाख ४ हजार ५५० रुपयांचा दंड वसुल केला.

भुसावळ रेल्वे स्थानकावर दिवसभरात किमान दोनशेहून अधिक रेल्वे गाड्या थांबतात व त्यातून हजारो प्रवासी चढ-उतार करून प्रवास करतात. अनेकदा प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहून काही प्रवासी तिकीट काढणे टाळतात शिवाय जनरल तिकीटावर स्लीपर वा एसी डब्यात जावून बसतात. यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होते. अशा प्रवाशांवर भरारी पथकाकडून धडक कारवाई केली जात आहे. रेल्वे प्रवाशांनी नियमांचे पालन करावे. शिवाय प्रवासात योग्य तिकीट घेवून प्रवास करावा व दंडात्मक कारवाई टाळावी, असे भुसावळच्या डीआरएम ईती पाण्डेय म्हणाल्या. तिकीट खिडकीवरील रांगा टाळण्यासाठी युटीएस अ‍ॅपचा वापर केल्यास वेळेची बचत होईल, असेही त्यांनी सांगितले.

Next Post
जैन इरिगेशनच्या चौघं कॅरम पटूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने गौरव

जैन इरिगेशनच्या चौघं कॅरम पटूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने गौरव

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group