• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतकऱ्यांपर्यंत पाण्याच्या योजनेचे व्यवस्थापन करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा जळगावात शुभारंभ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांपर्यंत पाण्याच्या योजनेचे व्यवस्थापन करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, (प्रतिनिधी) : येथे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा जळगावात शुभारंभ करण्यात आला. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रशासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पाण्याची योग्य योजना व व्यवस्थापन कसे पोहोचवता येईल, यासाठी नियोजन करावे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अधीक्षक अभियंता य.का. भदाणे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन कसे करावे आणि सुरुवातीपासूनच विशेष मोहीम हाती घेऊन लोकाभिमुख कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतील. महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५” कार्यक्रमाचा जळगाव येथे शुभारंभ झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासन राज्याला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी कटिबद्ध आहे. शेती, उद्योग आणि वाढत्या नागरीकरणासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या हक्काचे पाणी योग्य प्रकारे वापरण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांना अधिक सक्षम करून नदीजोड प्रकल्पांची अंमलबजावणी आणि उपलब्ध पाण्याचा चांगल्या पद्धतीने वापर करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” उपक्रम राबविण्यात येत आहे. महामंडळांचे सक्षमीकरण, शेतकरी संवाद व तक्रार निवारण, पाण्याची बचत करून सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर आणि जनजागृती हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रशासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पाण्याची योग्य योजना व व्यवस्थापन कसे पोहोचवता येईल, यासाठी नियोजन करावे. त्यांनी ई-ऑफिस प्रणालीचा वापर महसूल विभागात प्रभावीपणे होत असल्याचे नमूद केले आणि इतर सर्व विभागांनी व अधिकारी कर्मचाऱ्यांनीही याच पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. तसेच, भूसंपादन व पुनर्वसन संबंधित अडचणी सोडवण्यासाठी महसूल यंत्रणा नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला ज.द. बोरकर, कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगावचे अधीक्षक अभियंता यशवंतराव भदाणे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव संतोष भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांवरील पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 


Next Post
चोरट्यांच्या टोळीत चक्क पोलीस उपनिरीक्षक

चोरट्यांच्या टोळीत चक्क पोलीस उपनिरीक्षक

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलाचा विवस्त्र व्हिडीओ व्हायरल; दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गुन्हे

अल्पवयीन मुलाचा विवस्त्र व्हिडीओ व्हायरल; दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

July 13, 2025
प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group