• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी पिस्तूल विक्रीकरणाच्या उद्देशाने आणल्या प्रकरणी दोन जणांना अटक

गावठी पिस्टल, ४ जिवंत काडतुसे हस्तगत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 17, 2025
in गुन्हे
0
गावठी पिस्तूल विक्रीकरणाच्या उद्देशाने आणल्या प्रकरणी दोन जणांना अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धडक कारवाई करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना दि. १५ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली. राकेश दिलीप भावसार (वय ४१, रा. सदाशिवनगर, जळगाव) हा ज्ञानदेवनगर ते काशिनाथनगर रोडावर गावठी पिस्तूल घेऊन थांबला आहे. या माहितीवरून पोउपनिरीक्षक योगेश ढिकले आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. तपासणीदरम्यान आरोपीच्या कमरेला बांधलेले गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली.

त्याने दि. ६ एप्रिल रोजी दुपारी संशयित प्रसाद संजय महाजन (वय २८, रा. ज्ञानदेवनगर, जळगाव) याच्याकडून ५४ हजार रुपये रोख रक्कम देऊन हे शस्त्र खरेदी केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलिसांनी महाजन यालाही अटक केली. या दोघांनी संगनमत करून अवैध शस्त्राची खरेदी-विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक योगेश ढिकले, पोहेकॉ युवराज कोळी, रविंद्र बोदवडे, शशिकांत पाटील, अनिल कांबळे व पराग दुसाने यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.

Next Post
शेतकऱ्यांपर्यंत पाण्याच्या योजनेचे व्यवस्थापन करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

शेतकऱ्यांपर्यंत पाण्याच्या योजनेचे व्यवस्थापन करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add