• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सीईओ करनवाल यांनी केली शाळांसह ग्रामपंचायत इमारतींची पाहणी

भुसावळ तालुक्यात किन्ही, साकरी गावांना दिली भेट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
सीईओ करनवाल यांनी केली शाळांसह ग्रामपंचायत इमारतींची पाहणी

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी भुसावळ तालुक्यातील विविध गावांना भेट देत घरकुलाचे बांधकाम, तसेच ग्रामपंचायत इमारतींची पाहणी करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची चव चाखली. यावेळी त्यांच्यासमवेत भुसावळ गटविकास अधिकारी सचिन पानझडे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळ सत्रात भुसावळ तालुक्यातील किन्ही व साकरी या गावांना अचानक भेट देऊन तेथील ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. त्यासोबतच दोन्ही ठिकाणच्या प्राथमिक शाळा तसेच गावात सुरू असलेल्या घरकुल बांधकामांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेत त्याबाबत सुरू असलेल्या अंमलबजावणी संदर्भातले आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे संवाद साधत जमिनीवर बसून विद्यार्थ्यांमध्ये मिसळत शालेय पोषण आहाराची चव चाखली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे व दर्जा देखील उंचावला पाहिजे या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करण्यासोबत विविध उपक्रम राबवण्याबाबत देखील त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Next Post
पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदांकरीता आरक्षण सोडत जाहीर

पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदांकरीता आरक्षण सोडत जाहीर

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group