• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरी प्रकरणी एकास अटक ; अमळनेर पोलिसांची कामगिरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 15, 2025
in गुन्हे
0
दुचाकी चोरी प्रकरणी एकास अटक ; अमळनेर पोलिसांची कामगिरी

अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यात झाडी येथील दुचाकी चोरी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातीलच एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे.

झाडी गावचे रहिवासी महेंद्र धनसिंग पाटील यांची मोटरसायकल (एमएच १९ ईई ७१६५) हि दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० ते ९.२० दरम्यान पुनम हॉटेल शेजारी उभी केलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत फिर्यादीनुसार अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा अंतर्गत दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे झाडी येथील हिरालाल छोटू पाटील यास ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशान्वये अमळनेर पोलीस स्टेशनचे पो.उ.पनि. राजू जाधव व गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, गणेश पाटील, राजेंद्र देशमाने, उज्वल म्हस्के, विनोद संदानशिव, अमोल पाटील, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, उदय बोरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे व कॉन्स्टेबल भूषण परदेशी करत आहेत.

Next Post
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group