• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

क्रिकेटच्या आयपीएल सामन्यांवर सट्टा प्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना अटक

रावेर पोलिसांकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 14, 2025
in गुन्हे
0
क्रिकेटच्या आयपीएल सामन्यांवर सट्टा प्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना अटक

रावेर, (प्रतिनिधी) : शहरातील रामचंद्र नगर आणि डॉ. आंबेडकर चौकात आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणारे व जुगार खेळणाऱ्यांवर रावेर पोलीस स्टेशनतर्फे कारवाई करण्यात आली. यात रावेर पोलिसांनी दोन्ही कारवाईत आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या इसमांवर कारवाई करुन एकुन ०१ लाख २२ हजार ५०० रुपयाचा मुदेमाल जप्त केला आहे.

गुप्त बातमीदार व्दारे पोलिसांना माहीती मिळाली, रावेर शहरात दि.१२ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रामचंद्र नगरात घराचे आडोशाला दोन इसम हे आयपीएल क्रिकेट मॅचवर संघाचे हार जितवर लोकांकडुन पैसे घेवुन जुगाराचा खेळ खेळताना व जुगार लावताना दिसून आले. सदर इसमांवर छापा टाकला असता उभे असलेले इसम गल्ली बोळाचा फायदा घेवुन पळून गेले. त्या पैकी जुगाराचा खेळ घेणारे इसम हिरामण दगडु चौधरी (वय-६२, रा. रामचंद्र नगर, रावेर), आकाश हिरामण चौधरी (वय ३०, रा. रामचंद्र नगर, रावेर) असे पिता पुत्र यांना जागीच पकडुन त्यांची अंगझडती दरम्यान त्यांचेजवळ जुगाराचे बुक व काही मोबाईल मिळून आले आहेत. सदर इसमांवर रावेर पोस्टे येथे गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून १ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये रावेर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जुगारावर छापा टाकला असता उभे असलेले इसम गर्दीचा फायदा घेवुन पळुन गेले. त्यापैकी जुगाराचा खेळ घेणारा इसम अमनखाॅ मनसुरखॉ (रा. उटखेडा रोड, फतेहनगर, रावेर) यास पकडुन त्यांची अंगझडती घेतली. त्यांचे जवळ जुगाराचे बुक व मोबाईल मिळून आले आहेत. अमन खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचेकडून एकुण ११ हजार रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाही ही पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनात रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, गुन्हे शोध पथकातील पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.शि. प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, महेश मोगरे, विकार शेख, विशाल पाटील, सविन घुगे, सुकेश तडवी यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास कल्पेश आमोदकर हे करीत आहेत.

Tags: Crime
Next Post
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत यावलच्या तरुणाचा बुडून मृत्यू

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत यावलच्या तरुणाचा बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!
खान्देश

कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group