किरण चौधरी, जामनेर, (प्रतिनिधी) : जामनेर आगारात पाच नवीन बसेसची भर पडली आहे. महाराष्ट्र शासनाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळे पाच नवीन बसेस मिळाल्या असून याचा आनंद कर्मचाऱ्यांनी उत्साहात साजरा केला. दरम्यान नवीन बसेसचे लोकार्पण व पूजन तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, डॉ. प्रशांत भोंडे, दिपक तायडे, अतिश झाल्टे, जामनेर बस आगार प्रमुख दिनेश नाईक, बस आगार चे अधिकारी गोविंद पवार, अमोल सुरवळकर, गोपाल वाघ, सुनील पाटील, ग्रुपसिंग महाजन, मोहन जैन, जी एम करवंदे, अनिल वंजारी, गणेश पाटील, वैभव पाटील, अनिल जैन यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अनेक दिवसापासून जामनेर बस आगारांमध्ये जुन्या गाड्या चालू असून यामुळे मोठा त्रास वाहक व कर्मचाऱ्यांना होत होता. त्यामुळे नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती महाराष्ट्र शासनातर्फे पाच नवीन बसेस जामनेर आगाराला मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी डीजेच्या तालावर नाचत जल्लोष व स्वागत केले. नवीन बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.