जळगाव, (प्रतिनिधी) : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, शासनाच्या विविध विभागातील कार्यालये, महामंडळे, तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी उद्योग यांच्या आस्थापनेवरील मनुष्यबळाची माहिती नोंदवण्यासाठी जळगाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
दिनांक १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत कार्यरत असणाऱ्या उद्योगांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे. माहे १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीचे आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-१) या विभागाच्या नमूद संकेत स्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील नियोक्तेवर क्लिक करुन आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत भरावयाची आहे.
याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र.०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. यात कसूर झाल्यास आणि आस्थापना दोषी आढळल्यास कायदेशिर कारवाई होऊ शकते. असे संदिप ज्ञा. गायकवाड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविलेले आहे.