• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मल्हारच्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन, हेल्प फेअर अंतर्गत देण्यात येणारा आरोग्यदूत पुरस्कार जाहीर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
मल्हारच्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन, हेल्प फेअर अंतर्गत देण्यात येणारा आरोग्यदूत पुरस्कार जाहीर

जळगाव, (प्रतिनिधी) : मल्हार च्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन द्वारे हेल्प फेअर अंतर्गत दरवर्षी देण्यात येणाऱ्या आरोग्यदूत पुरस्कारांची नावे नुकतीच जाहीर झाली असून या वर्षी या पुरस्काराचे सहा जण मानकरी ठरले आहेत. यात उमेश बेंडवाल, गौतम सोये, सोनू चिरवडे, सुंदराबाई आहिरे, दीपाली भालेराव, बबलू गायकवाड असे पुरस्कारार्थींचे नावे आहेत.

या पुरस्कारांतर्गत एक स्मृतिचिन्ह व रु. ५००० चे रोख पारितोषिक दिले जाते. सोबतच प्रत्येक पुरस्कारार्थी ची चित्रफीत बनवून ती कार्यक्रमात दाखविली जाते. या वर्षीचा आरोग्यदूत पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि.४ एप्रिल २०२५ रोजी, सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे स.१२ ते दु १ या वेळेत जळगाव शहर महानगरपालिका आणि ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट घेत असलेल्या कार्यक्रमात होणार आहे.

या पुरस्कारासाठी महानगरपालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांच्या कार्याचे वर्षभर अवलोकन करून त्यातून पुरस्कारार्थी ठरवले जातात. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने ही निवड केली जाते. दरवर्षी या पुरस्कारासाठी कार्यक्रमाचे नियोजन मल्हार कम्युनिकेशन्स, जळगांव करीत असते. आरोग्यदूत पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दरवर्षी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक श्री. सिद्धार्थ बाफना यांचे मार्गदर्शन लाभते.

यावर्षी पुरस्कारासोबतच सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्नेहभोजन ही देण्यात येणार असून महानगरपालिकेच्या प्रत्येक कायम स्वच्छता कर्मचाऱ्याला त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एक सन्मानपत्र वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मल्हार कम्युनिकेशन्स चे शाम पवार, कृष्णा भोई, साजिद खान, चारुदत्त मल्हारा, निखिल शिंदे आदींनी परिश्रम घेतल्याचे हेल्प फेअर टीमचे सदस्य भरत अमळकर, प्रकाश चौबे, गनी मेमन, नंदू अडवाणी, अमर कुकरेजा, चंद्रशेखर नेवे, प्रशांत मल्हारा व आनंद मल्हारा यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

Next Post
दुचाकी समोरासमोर धडकल्याने न्यायालयातील लिपिकाचा मृत्यू

दुचाकी समोरासमोर धडकल्याने न्यायालयातील लिपिकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group