जळगाव, (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालया मध्ये मंगळवारी पालक मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मुकेश नाईक, उपशिक्षिका शितल कोळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका सुवर्णा अंभोरे यांनी केले. त्यांनी शाळेतील विविध उपक्रम आणि शाळेतील विविध स्पर्धा याबद्दल माहिती दिली. तसेच पालकांचे सर्व समस्या ऐकून घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व उपाययोजना करू असे आश्वासन पालकांना दिले. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते असेही मनोगतातून सांगितले. तसेच विद्यार्थी गैरहजर, शाळेबाहेरील विद्यार्थी समस्या, मोबाईल वापराबाबत काही समस्या, इको क्लब स्थापनेचे महत्त्व, पुढील शैक्षणिक वर्षात अभ्यासातील बदल या विषयावर चर्चा करण्यात आली.
तसेच विद्यार्थी पालक यांनीही शाळेतील सर्व उपक्रम व शाळेतील नियोजन याबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकास हा शाळेतच होतो असे प्रतिपादनही यावेळी केले. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे व दररोज शाळेत पाठवावे, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्व शिक्षक नेहमीच प्रयत्नशील आहेत. असे यावेळी सांगितले. सदर पालक प्रबोधन मेळाव्याला विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.