भडगाव, (प्रतिनिधी) : राज्यातील महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारने नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा २०२४-२५ या वर्षासाठी विधान मंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करून या समितीवर सदस्य म्हणून नियुक्त्या नेमणूक करण्यात आल्या आहेत. यातील राज्य शासनाची अतिशय महत्त्वाची समिती समजल्या जाणाऱ्या इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) कल्याण समिती सदस्यपदी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीचा भडगाव तालुक्यातील गुढे वडजी जिल्हा परिषद गटातून जल्लोष व स्वागत केले जात असून या गटातून माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती विकास पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पी ए पाटील, देखरेख संघाचे माजी चेअरमन संजय पाटील, युवा उद्योजक प्रविण महाजन (कोळगाव), माजी लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील, चाळीसगाव तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश भोकरे, सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विठ्ठल माळी, भडगाव शेतकरी संघाचे संचालक गोविंद एकनाथ महाजन, माजी ग्रा.पं. सदस्य कैलास महाजन (गुढे) अनिल बिहार्डे आदी शिवसेना युवासेना, महिला सेना आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.