• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दारू विक्रेत्याचा पाठलाग करताना पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

दारू विक्रेत्याने लाथ मारून पाडल्याने दुचाकी झाडाला धडकली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 25, 2025
in गुन्हे
0
दारू विक्रेत्याचा पाठलाग करताना पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

बुलडाणा, (वृत्तसेवा) : दुचाकीवरुन दारुची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी दुचाकीवरून पाठलाग करतांना दारु विक्रेत्याने पोलीसांच्या दुचाकीला लाथ मारल्याने पोलीसाची दुचाकी झाडावर आदळली. या भीषण अपघातात एक पोलीसाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा पोलीस कर्मचारी जबर जखमी झाल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील शेळगाव आटोळा शिवारात रविवारी दि.२३ रोजी घडली आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील अवैध दारुचा व्यवसाय करणारा संशयित आरोपी संजय उत्तम शिवणकर हा त्याच्या स्वताच्या दुचाकीवरुन अवैधरित्या दारुचे बॉक्स घेऊन जात होता. ही बाब याच परिसरात कर्तव्यावर असलेले बिट कॉन्स्टेबल भागवत गणेश गिरी व जमादार रामेश्वर अवचित आंधळे यांच्या लक्षात आली. ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित अवैध दारु वाहतूक करणाऱ्या संजय शिवणकर याला थांबायचे सांगितले. मात्र संजय शिवणकर याने गाडी न थांबताच पळ काढला म्हणून रामेश्वर आंधळे व भागात गिरी यांनी त्याचा पाठलाग सुरु केला.

पाठलाग सुरु केल्याचे अवैध दारु वाहतूक करणाऱ्या संजय शिवणकरच्या लक्षात आले व त्याने गाडी जोरात पळवणे सुरु ठेवले म्हणून संबंधित पोलीसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. यावेळी पोलीसांची गाडी जवळ येत असल्याचे लक्षात आले व आता आपण पकडले जाऊ म्हणून संजय शिवणकर याने पोलीसांना काही कळण्याच्या आतच धावत्या दुचाकीवरुन पोलीसांच्या दुचाकीला जोराने लाथ मारली. अचानक लाथ मारल्याने पोलीसांचा गाडीवरील ताबा सुटला व दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोराने आदळली. या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल भागवत गिरी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर बिट जमादार रामेश्वर आंधळे हे जबर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारार्थ जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले आहे.

वरील घटना ही देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर या गावापासून काही अंतरावर असलेल्या शेळगाव आटोळा शिवारात घडली असून या घटनेत शिनगाव जहागीर येथील अवैध दारुची वाहतूक व विक्री करणाऱ्या संजय उत्तम शिवणकर यास अटक करुन त्याच्या विरोधात अवैध दारु वाहतूक व विक्री व पोलीसांवर हल्ला करणे या कलमाखाली रितसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयत पोलीस भागवत गिरी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा
जळगाव जिल्हा

‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा

April 12, 2026
जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती
गुन्हे

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

April 11, 2026
जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group