जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथे भीषण आग लागून तीन लाखाचे बांधकाम साहित्य, लाकडी पाट्या जळून खाक झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. वेळीच आगेवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
नशिराबाद येथील रहिवासी सुधाकर नांदुरकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नसून या आगीत नांदुरकर यांच्या तीन लाख रुपये किमतीच्या बांधकामाच्या पाट्या, लाकडं जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तसेच नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करत आग घेऊन नियंत्रण मिळवलं. वेळेस आग आटोक्यात आल्यामुळे मोठे नुकसान टळलं आहे. अन्यथा आगीने रौद्ररूप धारण करत केलं असतं तर शेजारच्याही घरांना आग लागून मोठे नुकसान झाले असते.